AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुची 14 दुकानं सील तरीही नाशिकच्या लिकर किंगला अटक नाही; एक्साईज विभागाच्या भूमिकेवरुन उलटसुलट चर्चा

नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईने अवैध मद्यविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

दारुची 14 दुकानं सील तरीही नाशिकच्या लिकर किंगला अटक नाही; एक्साईज विभागाच्या भूमिकेवरुन उलटसुलट चर्चा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Nov 24, 2020 | 4:23 PM
Share

नाशिक : शहरातील लिकर किंग म्हणून ओळख असलेल्या अतुल मदनवर नाशिकच्या एक्साईज (Liquor King Atul Madan) विभागाची मेहेरबानी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वसामान्यांना किरकोळ गुन्ह्यांसाठी खाक्या दाखवणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने, लिकर किंग अतुल मदनचे शहरातील तब्बल 14 दारु दुकानं सील केल्यानंतर देखील त्याला अद्याप अटक न केल्याने मदनवरच्या कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यसाठा करणारा ट्रक पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे (Liquor King Atul Madan).

ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गेल्या आठवड्यात नाशिक हद्दीत पशू खाद्याच्या ट्रकमधून जाणारा अवैध मद्यसाठा पकडला होता. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा हा मद्यसाठा शहरातील एकाच दारु दुकान मालकाच्या दुकानांमध्ये जात होता. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईने अवैध मद्यविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लिकर किंग अतुल मदन यांच्या मालकीच्या 14 दारु दुकानांना सील करत धडक कारवाई केली. दरम्यान, एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केलेली असताना, उत्पादन शुल्क विभाग मात्र अतुल मदन यांच्याकडून खुलासा आल्यानंतर अटक करु, अशा डिफेनसिव्ह मोडमध्ये का आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

यापूर्वी देखील निवडणुकीच्या काळात आणि इतर वेळेस देखील अनेकदा कारवाया झाल्या. मात्र, गल्लीपासून दिल्लीपर्यंत अधिकारी आणि नेत्यांना मॅनेज करत मदनने आपले हात पुन्हा दगडा खालून काढून घेतल्याची चर्चा आहे. इतर किरकोळ गुन्ह्यांमध्ये लोकांना खाक्या दाखवणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने मदनबाबत मात्र एवढा सॉफ्ट कॉर्नर का दाखवला, असा सवाल आहे.

Liquor King Atul Madan

संबंधित बातम्या :

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...