Ayodhya verdict live : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा

अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर (Ayodhya verdict live) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ayodhya verdict live : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा
Follow us
| Updated on: Nov 09, 2019 | 11:56 AM

नवी दिल्ली : अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर (Ayodhya verdict live) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला. “अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा” असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे. “एखादी ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा” असेही नमूद केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार आहे.

संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची, वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही असेही सर्वोच्च न्यायलयात स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे.

त्याशिवाय मशीद कधी बांधली याची माहिती मिळालेली नाही. पण याचे बांधकाम बाबरच्या काळात झाले होते. दरम्यान मशिदीच्या खाली जी वास्तू होती, ती इस्लामिक नव्हती. मंदिर तोडून मशीद बांधल्याची ठोस माहिती नाही. अस सांगत शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरचा दावा फेटाळला आहे.

अयोध्या प्रकरणी निकाल लागल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्टेशन, बस डेपो, विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली (Ayodhya verdict live) आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील काळात या मुद्द्यावर दैनंदिन सुनावणी घेत सर्व पक्षांच्या बाजू ऐकल्या. त्यानंतर हा निर्णय दिला (Supreme Court Verdict on Ayodhya Case) आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश होता. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्व देशांचे लक्ष होते.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय – अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा

?वादग्रस्त जागा रामलल्लाला/हिंदूंना बहाल, ?मंदिर निर्माणासाठी नियम बनवा, केंद्राला आदेश ?मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार ?ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा

?शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरचा दावा फेटाळला ?मशीद कधी बांधली याची माहिती नाही, पण बाबराच्या काळात बांधकाम ?मोकळ्या जागेवर बाबरी मशीद बांधलेली नाही ?मशिदीच्या खाली वास्तू होती, ती वास्तू इस्लामिक नव्हती ?मंदिर तोडून मशीद बांधल्याची ठोस माहिती नाही

Ayodhya LIVE UPDATE : 

[svt-event title=”वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल – सुप्रीम कोर्ट ” date=”09/11/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल, मंदिर निर्माणासाठी नियम बनवा, केंद्राला आदेश, मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार – सुप्रीम कोर्ट

[/svt-event]

[svt-event title=” मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा मिळेल” date=”09/11/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा मिळेल, केंद्र सरकारने 3 महिन्यात योजना बनवावी, रामलल्लाचा दावा कोर्टाला मान्य – सुप्रीम कोर्ट

[/svt-event]

[svt-event title=”सुन्नी बोर्डास अन्यत्र जमीन देणे आवश्यक, जमिनीचे त्रिभाजन अयोग्य – सुप्रीम कोर्ट” date=”09/11/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वादग्रस्त वास्तू पाडणे हे सुद्धा कायद्याचं उल्लंघन” date=”09/11/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ] जमिनीचे त्रिभाजन अयोग्य, वादग्रस्त वास्तू पाडणे हे सुद्धा कायद्याचं उल्लंघन, मुस्लिम पक्ष ताबा सिद्ध करण्यात अपयशी – सुप्रीम कोर्ट

[/svt-event]

[svt-event title=”खोदकामातील तथ्ये दुर्लक्षित करता येणार नाहीत, मोकळ्या जागेवर मशीद बांधली नव्हती – सुप्रीम कोर्ट” date=”09/11/2019,10:46AM” class=”svt-cd-green” ] खोदकामातील तथ्ये दुर्लक्षित करता येणार नाहीत, मोकळ्या जागेवर मशीद बांधली नव्हती – सुप्रीम कोर्ट

[/svt-event]

[svt-event title=”निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला” date=”09/11/2019,10:43AM” class=”svt-cd-green” ] मीर बाकीनेच बाबरी मशीद बनवली होती, निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला, 1949 मध्ये दोन मूर्ती ठेवल्या, रामलल्लाला कोर्टाची कायदेशीर मान्यता [/svt-event]

[svt-event title=”शिया वक्फ बोर्डानेही जमिनीवर दावा केला होता, मात्र त्यांची याचिका फेटाळली,” date=”09/11/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सरन्यायाधीश रंजन गोगोई : 1946 च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळत आहोत” date=”09/11/2019,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली” date=”09/11/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रन्यायाधीश रंजन गोगोई सुप्रीम कोर्टात पोहोचले” date=”09/11/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ] सरन्यायाधीश रंजन गोगोई सुप्रीम कोर्टात पोहोचले, अवघ्या 5 मिनिटात निकाल वाचनाला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”सुप्रीम कोर्टात सीआरपीएफ चे 2500 सैनिक हजर, ड्रोन कॅमेराने सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक भागावर नजर” date=”09/11/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सीआरपीएफ चे 2500 सैनिक हजर, ड्रोन कॅमेराने सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक भागावर नजर [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत सध्या इंटरनेट सेवा सुरु ” date=”09/11/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत सध्या इंटरनेट सेवा सुरु आहे. मात्र निकालानंतरची परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. तर काही शाळांमध्ये शनिवार असल्याने सुट्टी आहे. दरम्यान ज्या शाळा सुरु आहेत. त्याठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोशल मीडियावरही मुंबई पोलिसांची करडी नजर” date=”09/11/2019,8:04AM” class=”svt-cd-green” ] सोशल मीडियावरही मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे. ज्या ठिकाणाहून आक्षेपार्ह पोस्ट शेअर होतील, ते अकाऊंट ब्लॉक करुन त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. एखादी फेक न्यूज, अफवा फिरत असेल तर पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वरून मीडियाच्या माध्यमातून त्याबाबत तात्काळ लोकांना समजणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 40 हजार पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने तैनात, एसआरपीएफ, आरएफ पथकही मुंबईत सज्ज” date=”09/11/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत 5 हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही आणि ड्रोन युनिटद्वारे आज लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुंबईत अद्याप कलम 144 लागू झालेला नसला, तरी उद्याच्या परिस्थितीवर यावर निर्णय घेण्यात येईल. [/svt-event]

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात 40 दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर 16 ऑक्टोबरला निकाल राखीव ठेवला होता. हा निकाल आज (9 नोव्हेंबर) सुनावण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी करताना याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अनेक ऐतिहासिक दस्तावेज, गॅझेट, ब्रिटीश काळातील जमिनीचे कागदपत्र आणि प्रवासवर्णन अशा गोष्टी सादर करत आपआपले दावे केले. यात भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालांचाही संदर्भ घेण्यात (Ayodhya Hearing) आला.

काय आहे अयोध्या जमीन वाद?

अयोध्या प्रकरण हे मुख्यतः जमीन वाद आहे. बाबरी मशीद राम जन्मभूमीचा वाद हा अनेक वर्ष जुना आहे. शिवाय हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच तणावाचा मुद्दा राहिलेला आहे. अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बनवण्याची मागणी आहे. या जागेवर रामाचं मंदिर तोडून बाबरी मशिद बांधण्यात आली असा हिंदूंचा दावा आहे.

हिंदूंच्या मते, 1530 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकीने मंदिराच्या जागी मशिद बांधली. त्यामुळेच 90 च्या दशकात राम जन्मभूमी प्रकरणाने देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती.

अयोध्येतील 2.77 एकर जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान वाटप केले जावे, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने चार वेगवेगळ्या दिवाणी दाव्यांमध्ये 2010 साली दिला होता. या निर्णयाला 14 वेगवेगळ्या याचिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

40 वा दिवस सुनावणी

गेल्या 6 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर रोज सुनावणी सुरु होती. 16 ऑक्टोबरला या सुनावणीचा 40 वा दिवस होता.  हिंदू पक्ष, मुस्लीम पक्षाने आपआपल्या बाजू न्यायालयात मांडल्या . हिंदू पक्षाच्या वकीलांकडून ASI रिपोर्ट, पुराण, ग्रंथ, भावनिक आवाहनही करण्यात आलं, तसेच अनेकदा तीव्र युक्तीवादही झाले. दुसरीकडे, मुस्लीम पक्षाने ASI रिपोर्ट, सद्य स्थिती आणि इस्लामिक इतिसाह मांडला. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

सरन्यायाधीश इतिहास घडवणार?

सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते यापूर्वी अयोध्या प्रकरणावर निर्णय देऊन इतिहास रचणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याव्यतीरिक्त या प्रकरणाच्या संविधान पीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस.ए. नजीर यांचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.