AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारकडून दारु, गुटखा, तंबाखू विक्रीला परवानगी, जावेद अख्तर, रवीना टंडन भडकले

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात गृह मंत्रालयाने दारुची दुकाने तसेच पान मसाला, गुटखा आणि तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली (Lockdown 3 Liquor shop open) आहे.

केंद्र सरकारकडून दारु, गुटखा, तंबाखू विक्रीला परवानगी, जावेद अख्तर, रवीना टंडन भडकले
| Updated on: May 02, 2020 | 6:14 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले (Lockdown 3 Liquor shop open) आहे. त्यामुळे आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. मात्र या काळात काही झोनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात गृह मंत्रालयाने दारुची दुकाने तसेच पान मसाला, गुटखा आणि तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली आहे. या निर्णयावर बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री रविना टंडन यांनी संताप व्यक्त केला आहे.

दारुची दुकान सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त (Lockdown 3 Liquor shop open) केला आहे. “लॉकडाऊनदरम्यान दारुची दुकान सुरु करणे अत्यंत चुकीचे ठरेल. गेल्या काही दिवसात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. त्यामुळे जर दारु विक्री सुरु केली तर ती महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते,” असे ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे.

तर अभिनेत्री रविना टंडन यांनी पान, गुटख्याची दुकान उघण्याच्या निर्णयावर नाराजी वर्तवली आहे. “व्हा, छानचं, पान गुटख्याची दुकानं सुरु होणार, म्हणजे पुन्हा थुंकणे सुरु होईल!!”, असे रविना टंडन यांनी म्हटलं आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार ग्रीन, ऑरेंज, रेड झोनसाठी हे नियम लागू करण्यात येतील. पण रेड झोनमधील हॉटस्पॉटमध्ये या नियमांवर बंदी असणार आहे. ही सर्व दुकान उघडण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असणार आहे.

हे आहेत नियम

  • दारुच्या दुकानात एकावेळी पाचहून अधिक लोक उपस्थित राहू शकत नाही.
  • दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर असणे गरजेचे असणार आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी दारु पिणे, पान, गुटखा, तंबाखू खाणे यासारख्या गोष्टींना परवानगी दिली जाणार नाही.
  • गुटखा, पान, तंबाखूच्या दुकानातही एकाच वेळी पाच ग्राहकच खरेदी करु शकतात.
  • या दुकानात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहेत.
  • कंटेन्मेंट झोन असणाऱ्या जिल्ह्यात हे कोणतेही नियम लागू राहणार नाही.

दरम्यान या व्यक्तिरिक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगी असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे (Lockdown 3 Liquor shop open) अनिवार्य असेल.

संबंधित बातम्या :

Lockdown – 3 : ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

लॉकडाऊन 3 : कोणत्या झोनमध्ये काय सुरु आणि काय बंद?

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.