Lockdown Effect : लॉकडाऊन संपेना, पुण्यातील पठ्ठ्याने लग्नासाठी बुलेटने थेट कर्नाटक गाठलं

लॉकडाऊनची मुदत वाढतच चालली आहे, त्यामुळे पर्याय नसल्याने त्या तरुणाने परवानगी घेऊन बुलेटवरुन थेट कर्नाटकातील गुलबर्गा गाठलं.

Lockdown Effect : लॉकडाऊन संपेना, पुण्यातील पठ्ठ्याने लग्नासाठी बुलेटने थेट कर्नाटक गाठलं
Nupur Chilkulwar

|

May 12, 2020 | 7:26 PM

सोलापूर : लग्न म्हटलं की गरीब असो वा श्रीमंत असो, धामधूम आलीच (Lockdown Effect On Weddings). मात्र, सध्या कोरोनाने सगळं चित्र बदललं आहे. या बदलाला लोकही आता स्वीकारु लागले आहेत. लॉकडाऊन असल्याने अनेकांची लग्न लांबणीवर गेली आहेत. मात्र, पुण्यातील एका तरुणाने थेट बुलेटवरुन (Lockdown Effect On Weddings) कर्नाटक गाठत लग्न केलं आहे.

पुण्यातील एका तरुणाचं ठरलेले लग्न लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आलं होतं. मात्र, लॉकडाऊनची मुदत वाढतच चालली आहे, त्यामुळे पर्याय नसल्याने त्या तरुणाने परवानगी घेऊन बुलेटवरुन थेट कर्नाटकातील गुलबर्गा गाठलं. तिथे जाऊन विवाह सोहळा उरकला आणि लग्नाच्या मंडपातून नववधूला घेत थेट बुलेटवरुन पुण्याकडे रवाना झाला.

संतोष सुरवसे आणि प्रियांका सूर्यवंशी या दोघांचं लग्न ठरलं होतं. संतोष सुरवसे हा पुण्यात पार्लरच्या व्यवसाय करतो. संतोष आणि प्रियांका यांचा 22 मार्चला विवाह होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे 22 मार्चचा विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला. मात्र, लॉकडाऊन (Lockdown Effect On Weddings) अद्यापही उठलेलं नाही.

त्यामुळे संतोष आणि प्रियांकाच्या घरच्यांनी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संतोष हा बुलेटवर 400 किमी अंतर पार करत कर्नाटकातील गुलबर्गा येथे प्रियंकाच्या गावी पोहोचला. काही ठराविक जणांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत पुण्यात पोहचणे आवश्यक होते. त्यामुळे संतोष पत्नी प्रियांकाला घेत बुलेटवरुन पुन्हा पुण्याकडे रवाना (Lockdown Effect On Weddings) झाला.

संबंधित बातम्या :

सोलापुरात पहिला रुग्ण सापडून 1 महिना पूर्ण, 12 एप्रिल ते 12 मेपर्यंत किती कोरोना रुग्ण सापडले?

देहू, आळंदी पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें