पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, माधुरी दीक्षित म्हणते…

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून पुण्यातून यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली आणि पुणे भाजपमधील धुसफूस दिसून आली. पण आता यावर माधुरी दीक्षितच्या वतीने पहिल्यांदाच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या सर्व अफवा असल्याचं माधुरी दीक्षितच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. या सर्व खोट्या आणि काल्पनिकबातम्या आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत संपर्क फॉर समर्थन […]

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, माधुरी दीक्षित म्हणते...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून पुण्यातून यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली आणि पुणे भाजपमधील धुसफूस दिसून आली. पण आता यावर माधुरी दीक्षितच्या वतीने पहिल्यांदाच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या सर्व अफवा असल्याचं माधुरी दीक्षितच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.

या सर्व खोट्या आणि काल्पनिकबातम्या आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गतभेट घेतली होती. त्यावेळी अमित शाह यांनी मोदी सरकारच्या कामगिरीविषयी माहित दिलीहोती, अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितच्या वतीने तिच्या प्रवक्त्याने दिली.

भाजपने काय स्पष्टीकरण दिलं?

भाजपने यावर स्पष्टीकरण देत, अजून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाचा निर्णय अंतिम असतो, अजून असा निर्णय झालेला नाही, अशी माहिती पुणे भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. पुण्यातून माधुरीला जर उमेदवारी दिली, तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, माधुरीला उमेदवारी देण्यासारखी वेळ भाजपवर अजून आलेली नसल्याचं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. आठ आमदार आणि दोन खासदार असताना भाजपकडे सक्षम उमेदवार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षण सुद्धा केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.

‘मिड डे’च्या वृत्तानुसार, 2019 साली भाजपकडून माधुरी दीक्षितला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. माधुरीसाठी मुंबई आणि पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी झाली. त्यात पुण्यातून माधुरीला लोकसभेसाठी उतरवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते, काहीशे तटस्थ आणि भाजपविरोधक अशा मतदारांकडून भाजपने या सर्वेक्षणाअंतर्गत मतं जाणून घेतली.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.