दरोड्यातील रक्कम नेपाळच्या माओवाद्यांना, मुंबईत दया नायक यांच्या पथकाकडून दरोडेखोराला अटक

अंधेरी भागात दरोडा टाकण्यासाठी काही दरोडेखोर येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती (Daya Nayak team arrests Maoist Robber)

दरोड्यातील रक्कम नेपाळच्या माओवाद्यांना, मुंबईत दया नायक यांच्या पथकाकडून दरोडेखोराला अटक
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 5:17 PM

मुंबई : महाराष्ट्र एटीएसने केलेल्या मोठ्या कारवाईत माओवादी समर्थक दरोडेखोराला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने मुंबईतील अंधेरी भागात ही कारवाई केली. (Daya Nayak team arrests Maoist Robber)

अंधेरी भागात दरोडा टाकण्यासाठी काही दरोडेखोर येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. त्या आधारावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा लावला होता.

दरोडेखोर हे सध्याच्या लॉकडाऊनचा फायदा उठवून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. मात्र आधीच पाळतीवर असलेल्या जुहू युनिटच्या अधिकाऱ्यांनी मस्तकार पेट्रोल पंपाजवळ संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचं पिस्तुल आणि 3 जिवंत काडतुसे सापडली.

हेही वाचा : इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

चौकशीत त्याचं नाव दलविरसिंग बालवतसिंग रावत उर्फ राजा उर्फ पप्पू नेपाळी असल्याचं उघडकीस आलं. पप्पू नेपाळी याने आतापर्यंत 30 दरोडे टाकले आहेत. तो मोठमोठे दरोडे टाकायचा.

आरोपी पप्पू हा नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात होता. दरोड्यात मिळालेली रक्कम तो माओवाद्यांना द्यायचा. त्या पैशाचा वापर घातपाती कारवाया करण्यासाठी केला जात होता.

(Daya Nayak team arrests Maoist Robber)

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.