AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र दिनादिवशीच, महाराष्ट्र शब्द हटवला; स्वतंत्र विदर्भसाठी चंद्रपुरात आंदोलन, विदर्भवादी नेत्यांना अटक

शहरातील विश्रामगृहातून निघालेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लगतच्या सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलन केले

महाराष्ट्र दिनादिवशीच, महाराष्ट्र शब्द हटवला; स्वतंत्र विदर्भसाठी चंद्रपुरात आंदोलन, विदर्भवादी नेत्यांना अटक
शासनाच्या फलकावर जिथे महाराष्ट्र लिहिले आहे, तिथे विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलनImage Credit source: TV9
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: May 01, 2022 | 5:04 PM
Share

चंद्रपूर: महाराष्ट्र दिनादिवशी (Maharashtra) चंद्रपुरात विदर्भवाद्यांकडून (Chandrapur Vidharbh) अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर (government office) स्वतंत्र विदर्भाचे पोस्टर्स लावून आंदोलन केले. ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र होते, त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली. यावेळी विदर्भवादी नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स

शहरातील विश्रामगृहातून निघालेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लगतच्या सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलन केले गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

कार्यकर्त्यांना अटक

विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह कार्यकर्त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात अटक केली गेली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व त्यासाठीच्या आंदोलनांची मालिका सातत्याने सुरुच ठेवण्याचा निर्धारही विदर्भवादी नेत्यांनी कायम ठेवला.

तळपत्या उन्हात आंदोलन

महाराष्ट्र दिनादिवशी चंद्रपुरात विदर्भवाद्यांनी याप्रकारे अनोखे आंदोलन केले गेले गेल्याने स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणाही जोरदार पणे देण्यात आल्या. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांकडून सरकारी कार्यालयांवर ‘विदर्भ’ लिहिलेले स्टिकर्स लावून आंदोलन केले गेल्याने आणि जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

आंदोलन सुरुच ठेवणार

ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले गेल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विश्रामगृहातून निघालेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर असे विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलन आणि घोषणाबाजी केली. स्वतंत्र विदर्भाची मागणी करत, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशीही घोषणा देत महाराष्ट्र लिहिलेल्या फलकांवर विदर्भाची स्टीकर्स लावून विदर्भवादी नेत्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनानंतर विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह कार्यकर्त्यांना रामनगर पोलीसांनी अटक केली.स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व त्यासाठीच्या आंदोलनांची मालिका सातत्याने सुरुच ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा