राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?

राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचणीचा दर 1 हजार 200 रुपये इतका केला आहे (Maharashtra Government reduce corona test rates).

राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?
विशेष म्हणजे या कोरोना रुग्णाला स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून फोन केले जात होते. मात्र, हा व्यक्ती फोन उचलत नव्हता.
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 11:40 PM

मुंबई : राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग पाहता जास्तीत जास्त चाचण्या होणं जरुरीचं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचणीचा दर 1 हजार 200 रुपये इतका केला आहे. सध्या आरटीपीसीआर चाचणीचा दर 2 हजार 200 रुपये इतका होता. त्याआधी तोच दर 4 हजार 500 रुपये इतका होता. मात्र, जून महिन्यात सरकारने कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी केले होते (Maharashtra Government reduce corona test rates).

राज्यात खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात, अशा अनेक तक्रारी सरकारकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीचे दर ठरवण्यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली होती. या समितीने खासगी लॅबशी चर्चा करुन चाचण्यांचा दर कमी करण्याचा अहवाल सरकारपुढे मांडला होता. त्यानंतर राज्यात कोरोना चाचणीचे दर 2 हजार 200 रुपये इतके झाले होते. त्यानंतर लॉकडाऊनचा विचार करता समितीने कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करण्याचा अहवाल सरकारपुढे मांडला होता. या अहवालाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीने गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा विचार करुन कोरोना चाचणींचा दर आणखी कमी करण्याचा अहवाल राज्य सरकारपुढे मांडला. विशेष म्हणजे हा अहवाल सरकारपुढे सादर करण्याआधी समितीने खासगी प्रयोगशाळांशी चर्चादेखील केली आहे. या अहवालाला राज्य सरकारने सोमवारी (7 सप्टेंबर) मान्यता दिली (Maharashtra Government reduce corona test rates).

आरटीपीसीआर टेस्टचा दर निश्चित करणाऱ्या समितीच्या अहवालानुसार यापुढे खासगी लॅबमध्ये महाराष्ट्रात प्रति व्यक्ती कोरोना चाचणीसाठी 1200 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच एखाद्या रुग्णाच्या घरी जाऊन जर टेस्ट करायची असेल तर पूर्वी 2 हजार 800 रुपये आकारले जात होते. मात्र आता त्यासाठी फक्त 2000 रुपये आकारण्यात येणार आहे, असं राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोना केंद्रावरुन चाचणीसाठी रुग्णाचे सॅम्पल घेतले तर 1600 रुपये आकारले जाणार आहेत.

हेही वाचा : कल्याणमध्ये वृद्ध महिलेचा अ‍ॅम्ब्युलन्स अभावी मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.