कोण होणार ‘महाराष्ट्र केसरी’?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

जालना : ‘62 वी अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती’ किताबची अंतिम दंगल आज होत आहे. पुण्याचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफीक शेख या दोघांमध्ये ही दंगल होणार आहे. अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता असून सोलापूरच्या रवींद्र शेंडगे याच्यासोबत त्याची गादी गटातील अंतिम सामन्याची लढत झाली होती. तर यावर्षी महाराष्ट्र  कुस्ती स्पर्धेचा मानकरी कोण होणार याची […]

कोण होणार महाराष्ट्र केसरी?
Follow us on

जालना : ‘62 वी अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती’ किताबची अंतिम दंगल आज होत आहे. पुण्याचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफीक शेख या दोघांमध्ये ही दंगल होणार आहे. अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता असून सोलापूरच्या रवींद्र शेंडगे याच्यासोबत त्याची गादी गटातील अंतिम सामन्याची लढत झाली होती. तर यावर्षी महाराष्ट्र  कुस्ती स्पर्धेचा मानकरी कोण होणार याची उत्सुकता तमाम महाराष्ट्रातील कुस्ती रसिकांना लागलेली आहे.

मित्रांच्या मुलांमध्ये लढत…

अभिजित कटके आणि बाला रफीक शेख या दोघांचे वडील चांगले मित्र आहेत. त्यामुळे दोन मित्रांच्या मुलांची लढत आज होणार आहे. अभिजित कटके आणि बाला रफीक शेख यांच्या वडिलांमध्ये देखील कुस्ती झाली होती. तशीच परिस्थिती आजची आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार आता अंतीम टप्प्यात आला आहे. ही मानाची गदा कोण पटकावणार याकडे सर्व कुस्ती रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.

कोण आहे बाला रफीक शेख?

बाला रफीक शेख हा मुळचा सोलापुरचा आहे. तो कोल्हापुरच्या न्यु मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. त्याच्या घरात 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आलली आहे. बाला रफीक शेखचे वजन-120 किलो तर उंची-6 फुट आहे. बाला रफीक शेख वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटीलकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. तो सध्या पुण्याच्या हनुमान कुस्ती केंद्रात सराव करतो.

कोण आहे अभिजित कटके?

अभिजित कटके हा मुळचा पुण्याचा मल्ल. गेल्यावर्षी अभिजितने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. याचे वजन- 122 किलो आहे. हा शिवराम दादा तालमितील मल्ल आहे. अभिजितला घरातूनच कुस्तीचे बाळकडू पाजले गेले. त्याचे वडीलही एक कुस्तीपटू होते. अभिजित सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्याला राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव आहे. अभिजित कटके हा अमर निंबाळकरांचा शिष्य आहे. शिवराम दादा तालमित जाँर्जियाच्या विदेशी प्रशिक्षकाच्या निगरानीखाली त्याने कसुन सराव केला आहे.