राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, तब्बल 1421 पोलिसांना कोरोनाची तीव्र लक्षण

| Updated on: May 31, 2020 | 2:15 PM

राज्यात कोरोनाची तीव्र लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या 1421 वर पोहोचली आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं (Maharashtra Police Covid  Cases Update) आहे.

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, तब्बल 1421 पोलिसांना कोरोनाची तीव्र लक्षण
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Maharashtra Police Covid  Cases Update) आहे. राज्यात आज 91 पोलिसांना कोरोनाची तीव्र लक्षण जाणवली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तीव्र लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या 1421 वर पोहोचली आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

राज्यात एका दिवसात 91 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही 1421 वर पोहोचली आहे. यात 183 पोलीस अधिकारी आणि 1238 पोलीस कर्मचाऱ्यांना तीव्र लक्षण जाणवली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या जास्त आहे. दरम्यान पोलीस दलाकडून आज केवळ तीव्र लक्षण असलेल्या पोलिसांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, पण सौम्य लक्षण असलेल्या पोलिसांची आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला आहे.

दरम्यान संचारबंदीच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. आतापर्यंत 257 ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले आहे. यात 835 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर यात नागरिकांच्या हल्ल्यात 86 पोलीस जखमी झाले आहे.

संचारबंदीच्या काळात कोरोना संदर्भात राज्यात तब्बल एक लाख 20 हजार 150 गुन्हे दाखल झाले आहे. यात 23 हजार 575 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 76 हजार 445 वाहन जप्त करण्यात आले (Maharashtra Police Covid  Cases Update) आहेत.

संबंधित बातम्या : 

आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांची बदली, जेलमध्ये 200 पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण

परभणीत स्थलांतरितांच्या घरवापसीने कोरोनाचा विळखा वाढला, जिल्ह्यात 80 कोरोनाबाधित