मल्लिकार्जुन खर्गे यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा तीन दिवसांचा खर्च किती?

| Updated on: Nov 13, 2019 | 11:30 PM

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुन्हा सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच सध्या खर्गे यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा तीन दिवसांचा खर्च समोर आला आहे

मल्लिकार्जुन खर्गे यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा तीन दिवसांचा खर्च किती?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुन्हा सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचे देखील यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या त्यांच्या हॉटेलमध्ये राहण्याच्या तीन दिवसांचा खर्च समोर आला आहे (Mallikarjun Kharge Expenses). मल्लिकार्जुन खर्गे यांचा हॉटेलचा खर्च 48 हजार रुपये आहे. हा खर्च 3 दिवस हॉटेलमध्ये राहण्याचा आहे. या व्यतिरिक्त खाणं-पिणं आणि लग्झरी सुविधांचा खर्च वेगळा असल्याचं सांगितलं जात आहे (Mallikarjun Kharge Expenses).

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही (Maharashtra Political Crisis), राज्यात सत्तास्थापनेचा दावा करायचा की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील बडे नेते चांगलेच धावपळ करत आहेत. काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे देखील यापैकीच एक आहेत. मात्र, खर्गे यांच्या खर्चाचे तपशील समोर आल्यानंतर त्यांच्यावर काहीजणांकडून जोरदार टीकाही करण्यात येत आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या महाराष्ट्रातील 44 आमदारांवरील खर्चही समोर आला आहे. या आमदारांना जयपूरमध्ये ठेवण्यात आलं होतं. आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेसने राज्यातील सर्व 44 आमदारांना जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं.

काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेलं रिसॉर्ट देखील आलिशान होतं. इथे या आमदारांना राजा-महाराजांप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या रिसॉर्टच्या एका खोलीचं एका दिवसाचं भाडं 19 हजार रुपयांपेक्षा जास्त होतं. 52 खोलीच्या या रिसॉर्टला या आमदारांसाठी बुक करण्यात आलं होतं. या आमदारांवर काँग्रेसने जवळपास 50 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, देशातील आर्थिक मंदीवर नेहमी भाष्य करणाऱ्या काँग्रेसने आपल्या आमदारांवर केलेल्या या खर्चावर अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे.