Schools Re-Open | शाळांची घंटा पुन्हा वाजणार, राज्यात अनेक ठिकाणी शाळांची लगबग

ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज अखेर शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली

Schools Re-Open | शाळांची घंटा पुन्हा वाजणार, राज्यात अनेक ठिकाणी शाळांची लगबग
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 9:11 AM

मुंबई : कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा अखेर आजपासून (23 नोव्हेंबर) (Maharashtra Schools Re-Open) सुरु होत आहेत. ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज अखेर शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली (Thackeray Sarkar). त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून भरवण्यात येणार आहे (Maharashtra Schools Re-Open).

मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा उघडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. तर सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, उस्मानाबादसह 22 ठिकाणच्या शाळा सुरु होणार आहेत.

कुठे शाळा उघडणार कुठे बंद राहणार?

उस्मानाबादेत राष्ट्रगीत म्हणत शाळांना सुरुवात, मास्क घालून विद्यार्थी शाळेत दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 वी ते 12 शाळा आजपासून सुरु झाले आहेत. सर्वाधिक 20 शिक्षक कोरोना बाधित सापडलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर दिले जात होते, मास्क घालून विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. राष्ट्रगीत गात आठ महिन्यांनंतर शाळांना सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 481 शाळेत 70 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील शाळा आजपासून सूरु होणार नाहीत

हिंगोली जिल्ह्यातील शाळा आजपासून सूरु होणार नाहीत. दिवाळीत नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात झाल्याने शाळा सुरु होणार नाहीत. शिक्षक, शालेय समिती, पालक यांची बैठक घेऊन बैठकीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांच पत्र.

रत्नागिरी जिल्ह्यातील 458 शाळांपैकी 207 शाळा आजपासून उघडणार

रत्नागिरी जिल्ह्यातील 458 शाळांपैकी 207 शाळा आजपासून सुरु होणार आहेत. 83 हजार 900 मुलांपैकी केवळ 2 हजार 281 पालकांची संमतीपत्र मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर 60 टक्के कामकाज पालकांच्या संमतीवर अवलंबून राहाणार आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक 400 पालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. तर रत्नागिरी तालुक्यात केवळ 60 पालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील 1100 शाळा आजपासून सुरु होणार

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत. आज सकाळी 9 वाजता शाळांची घंटी वाजणार आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागातील तब्बल 1100 शाळा आज उघडणार आहेत. यावेळी खबरदारी जवळपास पाच हजार शिक्षकांची प्रशासनाने कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 9 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले. 9 पासून पुढचे वर्ग आजपासून होणार सुरु होणार आहेत. मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा अधिकार पालकांना आहे (Maharashtra Schools Re-Open).

नांदेड जिल्ह्यातील शाळा सुरु होणार नाहीत

जिल्ह्यातील कोव्हिडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन आणि शिक्षकांच्या rt-pcr चाचण्या आणि त्याचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. 1 डिसेंबरनंतर कोव्हिडची स्थिती लक्षात घेवून शाळा सुरु करण्याचे ठरविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद

कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव राज्यात 9 ते 12 शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी

जळगाव राज्यात 9 ते 12 शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असून जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरु करण्यासाठी तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी देखील सुरु असून आतापर्यंत 700 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. परंतु सध्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने उद्या शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. लवकरच बैठक घेऊन शाळा सुरु करण्यात बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांमध्येही वर्ग सुरु नाही

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांमध्येही वर्ग सुरु नाही. आता 25 तारखेला शाळा सुरु करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. 23 आणि 24 तारखेला कोरोना स्थितीचा आढावा घेणार. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 41 शिक्षक कोरोना पॅाझिटीव्ह, मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आधीच निर्णय झाला.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु

राज्य सरकारने शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आज पासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. नियम आणि अटी पालन करुनच या शाळा सुरु होणार आहेत. ऊरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय आणि जुनियर कॉलेज या शाळेतही जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटायझर करण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आले आहेत.

Maharashtra Schools Re-Open

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज; बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज; बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

शाळांना कोरोनाचं ग्रहण, अमरावतीत 22 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.