शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज; बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत शाळा सुरु करण्याच्या ( school opening) निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी व्यक्त केली.

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज; बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

अमरावती : शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत शाळा सुरु करण्याच्या ( school opening) निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी व्यक्त केली. तसेच शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (there is need of rethinking on school reopening decision said Bachhu Kadu )

“राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा कोरोनाची परिस्थिती वेगळी होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर मी मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे.” असं बच्चू कडू म्हणाले. तसेच, मी स्वतः अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने जिल्ह्याच्या प्रशासनासोबत बोलून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता, शाळेची सुरुवात लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच, शाळेच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपायदेखील अवलंबले जात आहेत. पण राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्याताही वर्तवली जात आहे. पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांत कोरोनारुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षकांनाच कोरोनाची लागण

तसेच, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, बीड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांतील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच कोरोनाग्रस्त झाल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकार शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (there is need of rethinking on school reopening decision said Bachhu Kadu)

संबंधित बातम्या :

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

Mumbai School | दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

Thane School | ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *