अधिकारी आम्हाला विचारत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांची नाराजी

कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेत मंत्र्यांना सहभागी करुन घेतलं जात नसल्याचा तक्रारीचा सूर मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लावला (State Cabinet Ministers express anger against  Administration)

अधिकारी आम्हाला विचारत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांची नाराजी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांकडून प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटला. समन्वयाचा अभाव, परस्परविरोधी निर्णय यांबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकारी आम्हाला विचारत नसल्याची तक्रारही मंत्र्यांनी मांडली. (State Cabinet Ministers express anger against  Administration)

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. यावेळी, कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेत मंत्र्यांना सहभागी करुन घेतलं जात नसल्याचा तक्रारीचा सूर मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लावला. प्रशासनात नसलेला समन्वय, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त काढत असलेले परस्पर विरोधी आदेश आणि घेत असलेल्या निर्णयांबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रशासन त्यांच्या स्तरावर विविध निर्णय घेत आहे, आदेश काढत आहे. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसारही राज्यात गोष्टी होत नसल्याची बाब अनेक मंत्र्यांनी बैठकीत समोर आणली. बहुताश मंत्र्यांनी मनातील धुसफूस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखवली.

हेही वाचा : अजित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात काम होत नाही का? महापौरांचा विरोधकांना सवाल

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत मुख्य सचिवांनी आदेश काढला, मात्र विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर वेगळाच निर्णय घेतात. कोणी काही तासांसाठी दुकानं सुरु ठेवतो, तर कोणी एक दिवसाआड, यामुळे राज्यात गोंधळ उडत असल्याचंही मंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.

(State Cabinet Ministers express anger against  Administration)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI