AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट… नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट नाहीच, कुणाला धक्का? कोर्टात असं काय घडलं?

पुण्याच्या लोहगडावरुन आपल्या होणाऱ्या पतीलाच प्रियकराच्या मदतीने ढकलणाऱ्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट... नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट नाहीच, कुणाला धक्का? कोर्टात असं काय घडलं?
ketan agarwal murder case
| Updated on: Jul 03, 2026 | 6:24 PM
Share

पुण्याचा उद्योजक केतन अग्रवाल याची लोहगडावरुन ढकलून हत्या केल्याचा आरोप असलेल्या त्याची वागदत्त वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना मावळ कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज मावळचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए .एम.विभुते यांच्या कोर्टात सादर केले आहे.

यावेळी कोर्टात आरोपींना घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करायचा आहे. सराव झाला त्याठिकाणी, पासपोर्ट फाडले त्या ठिकाणींना आरोपींना सोबत घेऊन पंचनामा करायचा आहे. आरोपी चेतन याचे कपडे जप्त करायचे आहेत असे सरकारी वकील राजश्री विरकुड यांनी सांगत तीन दिवसांची पोलीस कोठडीचा मागणी केली.

तसेच आरोपींची समोरासमोर बसवून पडताळी करायची आहे. मोबाईल डेटा प्राप्त झाला आहे. त्याची पडताळणी समोरासमोर करायची आहे. मोबाईलच्या रिकव्हर डेटा जरी प्राप्त झाला असला तरी कोड भाषेत संभाषण झाले आहे. त्याचा उलगडा करायचा आहे. कटात जवळच्या व्यक्तीचा सहभाग आहे का ? याचा तपास करणे गरजेचे आहे यासाठी तीन दिवसांची कोठडीची मागणी सरकारने केली, मात्र, ही कारणे पुरेशी नसल्याचे सांगतले कोर्टाने ही मागणी फेटाळत १४ दिवसांची ज्युडिशिल कस्टडी दिली आहे.

सियाचे वकीलाचा युक्तीवाद काय ?

सिया तपासात चांगले सहकार्य करत आहे, मोबाईल डेटा देखील रिकव्हर झाला आहे. मी काय लिहिलंय , सांकेतिक चिन्हांची पडताळणी करायचे आहे, हे कायद्यात बसत नाही. त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तीवादात करताना सांगितले. यावर सरकारी वकीलांनी युक्तीवाद करताना सांगितले की सांकेतिक चिन्ह आणि निक नेमचा वापर का आणि कशासाठी केलाय? हे ते दोघेचं सांगू शकतात. त्यामुळेच पीसी हवी असल्याचे सांगितले.

नार्को टेस्टची गरज –

न्यायाधीश ए .एम.विभुते यांनी पोलिस कोठडीसाठीच्या मागणीसाठी सरकारी पक्षाचे कारणे पुरेशी नसल्याचे सांगत पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी न्यायाधीश म्हणाले की नार्को टेस्टसाठी आरोपींची संमती लागेल, त्याशिवाय परवानगी मिळणार नाही. यावर सरकारी वकिलांनी या नार्को टेस्टची गरज नसल्याचे युक्तीवादात सांगितले.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय