DSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत

| Updated on: Aug 13, 2019 | 3:43 PM

मकरंद कुलकर्णी दुबईला पळून जात असताना, पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन अटक केली. आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करुन  पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

DSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत
Follow us on

DSK पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी (DSK) अर्थात डीएसके यांच्या भावाला अटक करण्यात आली आहे. मकरंद कुलकर्णी ( Makrand Kulkarni ) दुबईला पळून जात असताना, पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन अटक केली. आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करुन  पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

डी एस कुलकर्णींनी गुंतवणूकदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डीएसकेंच्या कंपनीत मकरंद संचालक आहे.

गुन्हा नोंद झाल्यापासून मकरंद फरार होता. पोलिसांनी मकरंदविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. मकरंदला अटक करण्यात आल्याने या फसवणुकीचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. अटकेनंतर मकरंदला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

घराला घर पण देणारी माणसे, अशी जाहिरातबाजी करत गुंतवणूकदरांची साधारण दोन हजार कोटींची फसवणूक केली. डीएसकेच्या कंपन्यांमध्ये मकरंद हा संचालक असून, फसवणुकीतील तो सहआरोपी आहे.

या घोटाळ्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमांगी, मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि इतर सहकारी तुरुंगात आहेत. मात्र मकरंद गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. पण अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने तपासाला वेग येणार आहे.