AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू

पुण्यात भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे 2 वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोर घडली.

पुण्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू
पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजुर तर तीन मुलांचा समावेश आहे.
| Updated on: Jun 29, 2019 | 10:51 AM
Share

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे 2 वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोर घडली. येथे असलेली भिंत लेबर कॅम्पवर कोसळल्याने अनेक मजूर भिंतीखाली सापडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर अग्निशमन दलाने तत्काळ मदतकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 3 मजुरांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अजूनही मदतकार्य सुरु आहे. याठिकाणी पुणे, हिंजेवाडी आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दलाची पथके आणि एनडीआरएफचे पथक मदत कार्य करत आहे.

कोंढवा बुद्रुकमधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ बिल्डिंगच्या इमारतीची संरक्षण भिंत शेजारी असलेल्या मजुरांच्या शेडवर पडली. कांचन कम्फर्ट या बांधकाम कंपनीकडून मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्यांच्या खोल्या बांधल्या होत्या. या खोल्या संरक्षण भिंतीच्या खालच्या बाजूला खड्ड्यात बांधलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे 2 च्या सुमारास संरक्षण भिंत थेट मजूरांच्या राहण्याच्या ठिकाणी पडल्याने अनेक मजूर त्याखाली सापडले.

आतापर्यंत घटनास्थळावर 15 मजूरांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.

मृतांची नावे

  1. आलोक शर्मा -28 वर्षे
  2. मोहन शर्मा -20 वर्षे
  3. अजय शर्मा -19
  4. अभंग शर्मा -19
  5. रवि शर्मा -19
  6. लक्ष्मीकांत सहानी -33
  7. अवधेत सिंह -32
  8. सुनील सींग -35
  9. ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )
  10. सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )
  11. विमा दास -28
  12. संगीता देवी -26

जखमी

  1. पूजा देवी -28 वर्षे

दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : जिल्हाधिकारी

पुणे-हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.

कोंढवा येथील दुर्घटनेवरून प्रथमदर्शनी बांधकाम मजुरांसाठी केलेली राहण्याची व्यवस्था सुरक्षित नव्हती, असेच दिसते आहे. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही कोंढव्यातील या दुर्घटनेबदद्ल दुःख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या तुंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली. फडणवीसांनी पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी सखोल चौकशीचेही आदेश दिले आहेत.

दोषींवर कठोर कारवाई करा : धनंजय मुंडे

विरोध परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कावाईची मागणी केली आहे. पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अजून काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

लेबरकॅम्प संदर्भात योग्य तरतूद करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.