आरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, टायर जाळून रस्ता अडवला

औरंगाबाद पैठण रोडवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ करण्यात आली आहे.

आरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, टायर जाळून रस्ता अडवला
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 9:09 PM

औरंगाबाद : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद पैठण रोडवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ करण्यात आली आहे. रोडवर टायर पेटवून संतत्प कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला आणि ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. (Maratha community aggressive in in Aurangabad block the road by burning tires for reservation)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. यावेळी जाळपोळ करत अशोक चव्हाण यांच्याही विरोधात घोणाबाजी करण्यात आली आहे. भर रस्त्यात जाळपोळ करून रस्ता अडवल्यामुळे थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा समाज आणि विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावेळी अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, “मराठा आरक्षणाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांचं विधान सरकारची असमर्थता दर्शविणारे असून सरकारची हतबलताच यातून दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ज्यांना सरकारवर विश्वास नसेल त्यांनी मराठा आरक्षणासाठी आपला वकील लावावा असे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर दरेकर यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

तर मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर पडण्यासाठी सरकारची बेपर्वाई कारणीभूत असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांना फटकारले. आता उद्धव ठाकरे किंवा अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन काही साध्य होणार नाही. आम्हाला याप्रकरणात राजकारण करायचे नाही. परंतु, आजच्या सुनावणीवेळी घडलेल्या प्रकारावरून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे आणि बेपर्वाई करत असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

इतर बातम्या –

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या, अन्यथा मिळणार नाही ट्रेनमध्ये प्रवेश

उद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन

(Maratha community aggressive in in Aurangabad block the road by burning tires for reservation)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.