‘अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा’, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Jun 23, 2020 | 8:23 AM

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना आक्रमक झालीय (Maratha Kranti Thok Morcha on Ashok Chavan ).

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना आक्रमक झाली आहे (Maratha Kranti Thok Morcha on Ashok Chavan ). संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही न झाल्याने उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत लेखी पत्र देऊन मागणी केली. तसेच राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली असा सवालही केला आहे.

रमेश केरे यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत विनायक मेटे यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर दिलं होतं. यात मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक उमेदवारांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात न्यायालयीन बाजू तपासून घेण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनामुळेच आझाद मैदानवरील आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही बैठक अथवा निर्णय घेण्यात आलेला नाही.”

“सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेनं केलीये. यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही आयोजित करण्यात आलेली नाही. बैठकीचं आयोजन करण्यात येणार नसेल तर अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्ष पदावरुन हटवा,” असंही रमेश केरे म्हणाले.

“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि जयंत पाटील किंवा एकनाथ शिंदेंना निवडा”

या पत्रात रमेश केरे यांनी म्हटलं आहे, “मराठा उपसमितीचीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाज हितासाठी आजपर्यंत या समितीची एकही बैठक घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी एकाही नामवंत वकिलाची नियुक्ती केलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर बैठक बोलावून मराठा हितासाठी काय निर्णय घेतले याची माहिती द्यावी. अन्यथा त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी. त्यांच्याजागी उपसमितीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील किंवा एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष म्हणून निवडावे. यामुळे मराठा समाज्या मागण्या मान्य करुन घेण्यास मदत होईल.”

आझाद मैदानावर 47 दिवस आंदोलन करणाऱ्या तरुणांना नियुक्तीपत्र द्या

यात रमेश केरे यांनी आझाद मैदानावर 47 दिवस आंदोलन करणाऱ्या तरुणांचाही प्रश्न मांडला. तसेच या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांविषयी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि त्यांना नियुक्तीपत्र द्यावं, अशी मागणी केली.

संबंधित बातम्या :

जयंत पाटलांच्या भाषणावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणाबाजी

मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढवणार

मराठा क्रांती ठोक मोर्चाने बीडमध्ये पुन्हा उपोषणास्त्र उगारलं!

संबंधित बातम्या :

Maratha Kranti Thok Morcha on Ashok Chavan