MOVIE REVIEW : कसा आहे ‘मरजावा’?

80-90 च्या दशकापासून चावून चावून चोथा झालेलं कथानक दिग्दर्शक मिलाप झव्हेरीनं त्याच्या 'मरजावा' सिनेमात वापरलं आहे. ते बघून या सगळ्यांनाच आता 'मरजावा' म्हणायची वेळ आली (marjaavaan movie review) आहे.

MOVIE REVIEW : कसा आहे 'मरजावा'?
Follow us
| Updated on: Nov 15, 2019 | 10:07 PM

मुंबई : एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक शक्तीशाली राजा असतो. राजाची त्या नगरात प्रचंड दहशत असते. त्याची ही दहशत कायम ठेवण्य़ाचं काम त्याची दोन्ही मुलं करत असतात. बरं त्यातला एक मानलेला मुलगा (marjaavaan movie review) असतो. राजाचं आपल्या मुलापेक्षा मानलेल्या मुलावर प्रेम जास्त असते. आता येतो कहानी मे ट्विस्ट. राजाच्या मानलेल्या मुलाच्या आयुष्यात त्याच्या स्वप्नातली राजकुमारी येते आणि त्याचं आयुष्यचं (marjaavaan movie review) बदलतं. मग राजाच्या मुलाला चांगुलपणाची जाणीव होऊन तो बंडखोरी करतो. हुश्श्श्श्श……80-90 च्या दशकापासून चावून चावून चोथा झालेलं कथानक दिग्दर्शक मिलाप झव्हेरीनं त्याच्या ‘मरजावा’ सिनेमात वापरलं आहे. तसेच या चित्रपटातल्या प्रमुख नायक आणि खलनायकाला लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला (marjaavaan movie review) आहे. त्यामुळे सिनेमा खूपचं लाऊड झाला आहे.

‘सत्यमेव जयते’चा लाऊडनेस आणि ‘एक व्हिलन’चा प्लॉट दोन गोष्टींचं मिश्रण करुन बनवलेला चित्रपट म्हणजे ‘मरजावा’. ‘सत्यमेव जयते’नंतर मिलाप झव्हेरीकडून अपेक्षा वाढल्या होत्या. ‘मरजावा’ बघितल्यावर मात्र आपल्या सगळ्या अपेक्षांची माती होते. ‘एक व्हिलन’चा प्रभाव सुरुवातीपासूनच या सिनेमावर जाणवत राहतो. त्याचं झालं असं की मिलाप झव्हेरी साहेबांनी ‘एक व्हिलन’नंतर लगेचच ही स्क्रिप्ट लिहिली होती. या कथेवर मोहित सुरीनं ‘एक व्हिलन २’ करावा असा मिलापचा आग्रह होता. पण त्यांची ती योजना यशस्वी झाली नाही. काळ लोटला तसा मिलाप पण आपल्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी झाला. मग आला ‘सत्यमेव जयते’. सिनेमा हिट. दिग्दर्शक म्हणून मिलापची दखल घेतली गेली. मग काय भुषण कुमार यांनी बासनात गुंडाळली गेलेली स्क्रिप्ट मिलापला काढायला सांगितली. आता मिलापचा मागचा सिनेमा हिट आहे म्हटल्यावर रितेश आणि सिध्दार्थही बोर्डवर आलेत. दोघांनी स्क्रिप्ट वाचली होती की नाही देव जाणे. आता सिध्दार्थ-रितेश असल्यावर एक व्हिलनचंच पुढचं व्हर्जन मरजावा असेल असा समज झाल्यामुळे तारा आणि रकुलही बोर्डवर आल्यात, पण या सगळ्या मंडळींनी मिलापचं दिग्दर्शन आणि कथेवर जो अंधविश्वास ठेवला आहे, ते बघून या सगळ्यांनाच आता ‘मरजावा’ म्हणायची वेळ आली (marjaavaan movie review) आहे.

तर मी वर म्हटल्य़ाप्रमाणे या सिनेमातलं आटपाट नगर म्हणजे मुंबई. राजा म्हणजे अण्णा(नासिर). राजाचा मानलेला मुलगा रघु(सिध्दार्थ मल्होत्रा), राजाचा मुलगा (विष्णू). रघुची राजकुमारी झोया (तारा सुतारिया). रघुच्या प्रेमात बुडालेली आरजु (रकुलप्रीत सिंग). तर अशा या सगळ्या पात्रांभोवती या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. अण्णाचा आपला मुलगा विष्णूपेक्षा रघुवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे विष्णूचा रघुवर प्रचंड राग असतो. त्यातच विष्णूची हाईट दीड फूट असल्यामुळे त्याचा स्वभावही जरा जास्तच विक्षिप्त असतो. गुन्हेगारी जगतात गुरफटत चाललेल्या रघुच्या आयुष्यात एक दिवस झोया येते आणि त्याचं आयुष्यचं बदलतं. पण अचानक अशी काही घटना घडते की रघु झोयाला मारतो. आता रघु झोयाला का मारतो? असं काय घडतं की रघुला झोयाला मारावं लागतं? विष्णू आणि रघुचा वॉर कोण जिंकतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी तुम्हाला ‘मरजावा’ बघावा (marjaavaan movie review) लागेल.

साधारणत: कथानक तुम्हाला कळलं. त्यात नवीन असं काही नाही. नायक नायिकेचा खून करतो हा एकच प्लॉट या सिनेमाचं वेगळंपण. पण सिनेमाची पटकथा कमकुवत असल्यामुळे ही घटना अचूक परिणाम साधू शकत नाही. मिलापनं कलाकारांना लार्जर दॅन लाईप दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सगळेच कलाकार उथळ वाटतात. ‘मैं मारूंगा मर जाएगा, दोबारा जन्म लेने से डर जाएगा’, ‘जुम्मे की रात है, बदले की बात है, अल्लाह बचाए तुझे मेरे वार से, सारखे हेवी डोस असलेले संवाद ऐकून टाळ्या वाजवण्याऐवजी तुम्ही डोकं धराल. रितेश पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत आणि त्याच्या अपोझिट पुन्हा एकदा सिध्दार्थला घेऊन मिलापला वाटलं होतं की हा सिनेमा ‘एक व्हिलन’सारखं मॅजिक करेल. हाच ओव्हरकॉन्फीडन्स साहेबांना नडला. एडिटींग हा सुध्दा या सिनेमाचा कमकुवत दुवा आहे. सिनेमॅटोग्राफीच्या पातळीवरही हा सिनेमा निराश करतो. सिनेमाची गोष्टही उगाच लाऊड करुन वाढवली आहे. जर सिनेमा आटोपशीर घेतला असता तर बरं झालं असतं.

रघुच्या भूमिकेत सिध्दार्थ मल्होत्रानं निराश केलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर एकाच प्रकारचे एक्सप्रेशन संपूर्ण सिनेमाभर बघून चित्रपटगृहातून बाहेर निघताना तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन उडतील. रितेशनं साकारलेल्या विष्णूमुळे सिनेमात जान आहे. त्याने साकारलेला विष्णु भन्नाट आहे. त्याची हाईट 1.5 फूट असून सुध्दा तुम्हाला जराही त्याची दया येणार नाही. आता त्याची हाईट सिनेमात 1.5 फूट दाखवणं गरजेचं होतं का हा भाग वेगळा. तर रितेश या सिनेमाची खऱ्या अर्थानं जान आहे. त्याला सिनेमात अजून स्पेस मिळायला हवा होता. झोयाच्या भूमिकेत तारा सुतारिया गोड दिसली आहे. तिनं आपली भूमिकाही चोख निभावली आहे. पण संपूर्ण सिनेमात तिची सिध्दार्थसोबतची केमिस्ट्री अजिबात रंगली नाही. या जोडीशी आपण लवकर कनेक्ट होतं नाही. आरजूच्या भूमिकेत रकुलप्रीत ठिकठाक.. रवी किशन, नासिर यांच्या भूमिका छोट्या असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष करण्यासारखं काही नव्हतं.

सिनेमातील ‘तुम ही आना’ गाणं मस्त जमून आलं आहे, मात्र त्याचा सिनेमात योग्य वापर करण्यात आलेला नाही. बाकी सिनेमातील गाण्यांनी निराशा केली आहे. एकूणच काय तर दिग्दर्शन, कथा, संगीत, सिध्दार्थचा अभिनय, मांडणी, संवाद या सगळ्याच पातळ्यांवर ‘मरजावा’ निराश (marjaavaan movie review) करतो.

या सिनेमाला ‘टीव्ही 9 मराठी’कडून दीड स्टार्स

Non Stop LIVE Update
प्रसाद लाडांनंतर जरांगे आणि दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर, काय दिला इशारा?
प्रसाद लाडांनंतर जरांगे आणि दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर, काय दिला इशारा?.
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.