Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या कारच्या सुरक्षिततेचा विचार करत नसल्याचे दिसून येत आहे.

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 10:26 PM

नवी दिल्ली : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. (Maruti to Tata and Mahindra how safe are made in India cars in Crash test)

आपल सरकार रस्त्यांवरील अपघातांचे, अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सरकार कधी रस्ते आणि सुरक्षेचे नियम जारी करतं तर कधी वाहन कंपन्यांनी बनवलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेवरही लक्ष ठेवून असतं. त्यामुळे अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांची मजबुती, सुरक्षितता, वाहनांमध्ये एअरबॅग्सची सुविधा देण, एबीएससह ईबीडी आणि इतर सुरक्षा फिचर्स देण्यास सुरुवात केली आहे.

रस्त्यांवरील दुर्घटनांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते दुर्घटना घडतात. यामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोकांना जीव गमवावा लागतो. 31 मार्च 2021 पर्यंत ही संख्या 20 ते 25 टक्के कमी करणे हे आमचे लक्ष्य आहे.

सुरक्षिततेच्या बाबतीत मारुती सुझुकीची कार नापास

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. एस-प्रेसो ही कार मारुतीने एक छोटी एसयूव्ही म्हणून लाँच केली होती. या कारमधील केबिन स्पेस जास्त आहे आणि किंमत मात्र कमी, त्यामुळे ही कार टेस्टिंगसाठी पाठवण्यात आली होती.

सुरक्षिततेच्या बाबतीत एस-प्रेसो ही कार पूर्णपणे नापास झाली आहे. गाडीमध्ये केवळ चालकाच्या बाजूला एअरबॅग देण्यात आली आहे. गाडीमध्ये एअरबॅगचं किती महत्त्व आहे, ही बाब सगळेच जाणतात. तरीदेखील कंपनीने गाडीतील इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला दिसत नाही.

परिक्षणानंतर एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे की, या गाडीमधील चालक आणि सह-चालकाची छाती आणि मान बिलकुल सुरक्षित नाही. चालकाचे गुडघेदेकील सुरक्षित नाहीत. डॅशबोर्डमुळे सह-चालकाचे गुडघे थोडे सुरक्षित राहीले. एस-प्रेसोच्या बॉडीशेललादेखील फार चांगलं रेटिंग मिळालेलं नाही. ही गाडी अधिक लोडिंग झेलण्यास सक्षम नाही. याबाबत मारुतीच्या एका प्रवक्त्याला प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही भारत सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे आम्ही योग्य पद्धतीने पालन करत आहोत.

टाटा, महिंद्रा सर्वात सुरक्षित

दरम्यान, मारुतीच्या एस-प्रेसो या कारसह ग्बोबल NCAP द्वारे यावेळी अजून चार मेड इन इंडिया कार्सचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये ह्युंदाई ग्रँड i10 या कारला 2 स्टार, किआ सेल्टोस या कारला 3 स्टार देण्यात आले. किया सेल्टॉस ही कार भारतात बनवण्यात आली आहे. यावेळी टाटा अल्ट्रॉज आणि महिंद्रा XUV300 या दोन कार्सचेही परिक्षण करण्यात आले. या दोन्ही गाड्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. या दोन गाड्या सर्वात सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

ठरलं! 11 नोव्हेंबरला नवी Kia Sonet लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Maruti to Tata and Mahindra how safe are made in India cars in Crash test)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.