माऊली इज बॅक, रितेशच्या अॅक्शन थ्रिलर मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज

माऊली इज बॅक, रितेशच्या अॅक्शन थ्रिलर मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज


मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी माऊली सिनेमाच्या टीझरची क्रेझ कायम असतानाच आता सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. प्रेक्षकांना 14 डिसेंबर रोजी हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा पाहायला मिळणार आहे. रितेशचा पहिलाच मराठी सिनेमा लय भारीने कमाईची सर्व विक्रम मोडित काढले होते. त्यामुळे या सिनेमाचीही मोठी उत्सुकता लागली आहे.

इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला… आपल्या सारखा TERROR नाय….. अशी कॅप्शन देत रितेशने ट्रेलर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

या ट्रेलरमध्ये रितेशची अॅक्शन थ्रिलर एंट्री दाखवण्यात आली आहे. सिनेमाला अजय-अतुल यांचं संगीत आहे, तर दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया डिसोझा या सिनेमाची निर्माती आहे. 14 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

रितेशचा पहिलाच मराठी सिनेमा लय भारीने मराठी सिनेमातील अनेक विक्रम मोडीत काढले होते. या सिनेमातील रितेशची माऊली ही भूमिका प्रेक्षकांच्या एवढी पसंतीस उतरली, की त्याला लोक आजही माऊली या नावानेच हाक मारतात.

या सिनेमाची रिलीज डेट अगोदर 21 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र याच दिवशी शाहरुख खानचा झिरो सिनेमा रिलीज होत असल्यामुळे रितेशने आपल्या सिनेमाची रिलीज डेट बदलली. रितेशने दाखवलेल्या या दिलदारपणाने शाहरुखही भारावला होता.

पाहा ट्रेलर :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI