AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, एकाचवेळी सहा सदस्य अपात्र

Ajit Pawar NCP News : मावळच्या भाजे ग्रामपंचायतीत कर थकबाकीच्या प्रकरणामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांना अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर अपात्र ठरवण्यात आलं आहे.

NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, एकाचवेळी सहा सदस्य अपात्र
NCP Ajit Pawar GroupImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 3:27 PM
Share

पुण्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मावळमधील भाजे या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सहा सदस्य हे अपात्र ठरल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. हे सर्व प्रकरण ग्रामपंचायतीवरील थकबाकीचं आहे. त्यामुळे यामध्ये सरपंच, उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्य थेट अपात्र झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी यांच्यासह विकास वाल्हेकर, प्रमोद डगळे, सारिका पदमुळे आणि कविता चौरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. ग्रामपंचायत कर विहित मुदतीत न भरल्याप्रकरणी प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांनी विवाद अर्ज दाखल केला होता. सुनावणीनंतर अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी सहा जणांना अपात्र ठरवलं. मात्र, ग्रामपंचायत सदस्य विकास वाल्हेकर यांनी कर वेळेत न भरल्याचं मान्य करत, कारवाईमागे राजकीय आकस आणि षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

भाजपवर षडयंत्राचे आरोप

मावळच्या भाजे ग्रामपंचायतीत सरपंचासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य आणि भाजपचे तीन सदस्य अशी रचना होती. मात्र, ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याच्या प्रकरणात सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी यांच्यासह सहा जणांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. या कारवाईमागे भाजपने षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता अपात्र सदस्यांना या आदेशाविरोधात अपील करता येणार असून स्टे मिळाल्यास सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहू शकतात. मात्र अपील न केल्यास किंवा स्टे न मिळाल्यास ग्रामपंचायतीतील सत्तेचं समीकरण बदलणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासकाची नियुक्ती आणि त्यानंतर पोटनिवडणुकीची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना