भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही : सुनिल केदार

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरस अत्याचार प्रकरणी भाजपवर सडकून टीका केली आहे (Minister Sunil Kedar criticize BJP on Hathras rape case).

भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही : सुनिल केदार

वर्धा : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरस अत्याचार प्रकरणी भाजपवर सडकून टीका केली आहे (Minister Sunil Kedar criticize BJP on Hathras rape case). उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारला अहिंसेच्या ताकदीचा विसर पडलाय. त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवू. ते कधी कोसळतील हेही त्यांना कळणार नाही, असं मत सुनिल केदार यांनी व्यक्त केलं. ते सेवाग्राममधील बापू कुटी येथे गांधी जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले असता बोलता होते.

सुनिल केदार म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या देशात अजूनही लोकांना हिंसा आणि अहिंसा यातील फरक कळत नाही. त्यांना अहिंसेच्या ताकदीचा विसर पडला असेल तर येणाऱ्या काळात लोकशाहीच्या माध्यमातून हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना अहिंसेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांनी महात्मा गांधींच्या विचारावर आमचं राजकारण आणि समाजकारण उभं केलं आहे.”

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत”

हाथरस अत्याचार प्रकरणावरही सुनिल केदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांवर अत्याचार झाल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत वागत आहे. ते कोणत्या दिवशी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही.”

“महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सेवाग्रामच्या विकासाचा आराखडा तत्कालीन मंत्री रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता. त्यानुसार ही सर्व कामं झाली आहेत. सर्वच कामं होऊ शकली नाहीत याची खंत जरुर आहे. मात्र, कोव्हिडीच्या पार्श्वभूमीवर ही कामं पूर्ण करु शकलो नाही. काही लोकांच्या मनात काही कामं मागेच सोडली जातील अशा शंकाकुशंका आहेत. पण आम्ही कोणतंही काम मागे ठेवणार नाही. टप्प्याटप्प्याने सर्व कामं केली जातील,” असंही त्यांनी नमूद केलं.

सुनिल केदार म्हणाले, “महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वांनाच हेच सांगेल की अहिंसा हाच प्रगतीचा अचूक मार्ग आहे. अहिंसाच आपल्याला दशकोनदशके प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकते. महात्मा गांधींना हा विचार त्यांच्या कृतीतून सिद्ध केलाय. हिंसा करणाऱ्या इंग्रजांना अहिंसेला मानणाऱ्या माणसापुढे हा देश सोडावा लागला आहे. हे जगासमोर सिद्ध झालेलं गांधीजींचं कार्य आहे. हेच पुढेही राहिलं.”

संबंधित बातम्या :

Rahul Gandhi Hathras Live Update | “इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा”

UP Police | राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की; संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांविरोधात निदर्शने

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

Minister Sunil Kedar criticize BJP on Hathras rape case

Published On - 12:00 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI