मिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार

| Updated on: Sep 22, 2020 | 11:46 AM

मिरारोडमधील एका 30 वर्षीय गतिमंद नायजेरियन महिलेने रस्त्यावरच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (Mira Road Nigerian woman delivery in road) 

मिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार
Follow us on

मिरारोड : मिरारोडमधील एका 30 वर्षीय गतिमंद नायजेरियन महिलेने रस्त्यावरच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मिरारोडच्या हटकेश परिसरातील मंगल नगर भाजी मार्केटच्या समोर हा प्रकार घडला. ही महिला गतिमंद असल्याने स्थानिक शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तिची प्रसुती केली. (Mira Road Nigerian woman delivery in road)

मिरारोडच्या हटकेश परिसरात गिफ्ट ओहोक ही 30 वर्षीय नायजेरियन महिला राहते. ती सहा वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आली. मात्र ती नशेच्या आहेरी गेल्याने तिची नोकरी गेले. त्यातच तिचे मानसिक संतुलन बिघडले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती मिरारोडच्या मंगल नगर परिसरात रस्त्यावरच राहते.

मानसिक संतुलन बिघडल्याने तिला कोणी जेवण दिले तर ती खायची आणि रात्रीच्या वेळी ऑटोरिक्षा किंवा दुकानाबाहेर झोपत होती. मानसिक संतुलन बघिल्यावर तिला तिच्या देशात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातच डिसेंबर-जानेवारीदरम्यान तिला गर्भधारणा झाली.

रविवारी (22 सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास तिच्या पोटात कळा येऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला ओरडत होती. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि शाखाप्रमुख महेश शिंदे यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना फोनद्वारे कल्पना देत त्या ठिकाणी बोलवून घेतले. त्या मिरारोडच्या मंगलनगर भाजी मार्केटजवळील महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली.

त्यानंतर त्या महिलेला आणि बाळाला पालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्या बाळाची आणि आईची प्रकृती ठिक असल्याने त्यांना सोडण्यात आले. सध्या ती आपल्या मुलीला घेऊन रिक्षात राहत आहे.

आई गिफ्ट आणि मुलीचा प्रकृती स्थिर जरी असेल तरी स्थानिक नागरिक आणि काशीमिरा पोलिसांचे मदतीने तिला ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पण या मुलीचे वडिल नेमके कोण हे तिला माहिती नाही. त्यामुळे या आई आणि मुलीला न्याय मिळेल का, याकडे सर्व लोकांचे लक्ष लागले आहे. (Mira Road Nigerian woman delivery in road)

संबंधित बातम्या : 

शेताच्या बांधावरुन पिकांची नोंदणी होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ई-पीक ॲपविषयी महत्त्वाची बैठक

संभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा