Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ वाद थेट कोर्टात, ‘निर्णया’कडे मेकर्सचे लक्ष!

लखनऊ कोर्टात 'मिर्जापूर 2' वेब सीरीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ वाद थेट कोर्टात, ‘निर्णया’कडे मेकर्सचे लक्ष!

मुंबई : अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा यांच्या अभिनयाचा ‘भौकाल’ असणारी वेब सीरीज ‘मिर्झापूर’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरीजचे दुसरे पर्व मागच्या महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पहिल्या पर्वाप्रमाणेच ‘मिर्झापूर 2’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. मात्र, ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या मागे वादांचे शुक्लकाष्ट लागले आहे (Mirzapur 2 Controversy). हा वाद इतका वाढला की, तो थेट कोर्टात पोहोचला आहे (Mirzapur 2 controversy application filed against web series in Lucknow court).

मीडिया रिपोर्टनुसार, लखनऊ कोर्टात ‘मिर्जापूर 2’ वेब सीरीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे ‘मिर्झापूर 2’च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या वेब सीरीजमधून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची प्रतिमा डागाळली गेली आहे, असे या याचिकेत म्हणण्यात आले आहे. या मालिकेत भोजपूर भाषिक प्रदेश गुन्हेगारीमध्ये सहभागी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

एफआयआर दाखल करण्याची मागणी

‘कृष्णा सेने’च्या अध्यक्षांनी सदर याचिका कोर्टात दाखल केली असून, या वेब सीरीजचे निर्माते फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि ‘कालीन भैया’ साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार हजरतगंजच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (Mirzapur 2 controversy application filed against web series in Lucknow court)

मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या टॅग करत या वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हापासून हा वाद निर्माण झाला. या वेब सीरीजच्या माध्यमातून मिर्झापूरमध्ये गुन्हेगारी वाढलेली दाखवून, इथली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अनुप्रिया यांनी केला होता. याशिवाय ‘धब्बा’ कादंबरीच्या लेखकानेदेखील या वेब सीरीजवर आक्षेप घेतला होता.

काय असेल निर्मात्यांचे पुढचे पाऊल?

चित्रपट किंवा वेब सीरीजमधून सध्या असे वाद उद्भवत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच काही संस्थांना ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचे नावच बदलले. बॉबी देओल अभिनित ‘आश्रम’ वेब सीरीजसुद्धा वादात अडकली आहे. अशा परिस्थितीत मिर्झापूर मागचे वाद शामण्याचे नाव घेत नाहीयत. सध्या हा वाद कोर्टात पोहचला असून, कोर्ट काय निर्णय देईल, आणि त्यानंतर निर्मात्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Mirzapur 2 controversy application filed against web series in Lucknow court)

Published On - 10:40 am, Sat, 7 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI