गाडीला कट मारल्याचा राग, औरंगाबादेत टोळक्याचा हैदोस, बस चालकासह प्रवाशांना मारहाण

गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरुन औरंगाबादमध्ये जमावाने औरंगाबाद-शिरपूर बसवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (mob beat bus driver).

गाडीला कट मारल्याचा राग, औरंगाबादेत टोळक्याचा हैदोस, बस चालकासह प्रवाशांना मारहाण
चेतन पाटील

|

Feb 19, 2020 | 9:03 AM

औरंगाबाद : गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरुन औरंगाबादमध्ये जमावाने औरंगाबाद-शिरपूर बसवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (mob beat bus driver). जमावाच्या या हल्ल्यात बसचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जमावाने फक्त बसचालकालाच नाही तर प्रवाशांनाही मारहाण केली. जमावाच्या गुंडगिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जमाव बसचालकाला मारहाण करताना दिसत आहे. याशिवाय जमावाकडून बसची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे.

औरंगाबादहून शिरपूरकडे ही बस निघाली होती. औरंगाबाद आणि कन्नड शहरादरम्यान ही घटना घडली. गाडीला फक्त कट लागला म्हणून परिसरातील जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी बसचालकास शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली (mob beat bus driver). या मारहाणीत बसचालक सुधाकर श्यामराव शिरसाठ जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या जमावाने बसच्या काचा फोडत तोडफड केली. बसचालकाला मारहाण आणि बसची तोडफोड होत असताना बसमधील प्रवाशांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ आता समोर आले आहेत.

दरम्यान, या घटनेप्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें