मोदी समर्थक भारतीय वंशाच्या प्रीती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री

ब्रिटनमधील सत्ताधारी कंजर्वेटीव्ह पक्षाच्या सर्वात प्रमुख चेहऱ्यांपैकी त्या एक आहेत. बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्याप्रमाणेच प्रीती पटेलही उजव्या विचारधारेसाठी ओळखल्या जातात.

मोदी समर्थक भारतीय वंशाच्या प्रीती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 7:01 PM

लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या प्रीती पटेल (Priti Patel MP) यांना गृहमंत्रीपद देण्यात आलंय. 47 वर्षीय प्रीती पटेल (Priti Patel MP) या ब्रेक्झिटच्या समर्थक आहेत. ब्रिटनमधील सत्ताधारी कंजर्वेटीव्ह पक्षाच्या सर्वात प्रमुख चेहऱ्यांपैकी त्या एक आहेत. बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्याप्रमाणेच प्रीती पटेलही उजव्या विचारधारेसाठी ओळखल्या जातात.

प्रीती पटेल यांना 2017 मध्ये इस्रायल दौऱ्यात प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याप्रकरणी पद सोडावं लागलं होतं. कुटुंबासोबत सुट्टी साजरी करण्यासाठी त्या इस्रायलला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी ब्रिटनच्या इस्रायलमधील दुतावासाला माहिती न देताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय विकास मंत्री या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

ब्रिटनने युरोपियन युनियनमधून वेगळं होण्याचं प्रीती पटेल यांनी जाहीरपणे स्वागत केलं होतं. ब्रेक्झिटच्या समर्थनार्थ त्यांनी रॅलीही काढल्या होत्या. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी ज्या प्रकारे ब्रेक्झिटची वाटचाल केली, त्याचाही प्रीती पटेल यांनी विरोध केला होता. तर बोरिस जॉनसन यांना पक्षाचा नेता निवडला जावा यासाठी बॅक जॉनसन हे अभियानही चालवलं होतं.

मोदींच्या दौऱ्याची जबाबदारी सांभाळली

माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरन यांनी प्रीती पटेल यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जबाबदारी दिली होती. लंडनमध्ये भारतीय समुदायात प्रीती पटेल मोदींच्या समर्थक म्हणूनही परिचित आहेत. भारतीय वंशाच्या समुदायातील कार्यक्रमांमध्ये प्रीती पटेल प्रमुख अतिथी असतात.

प्रीती पटेल यांचे आई-वडील गुजरातहून आफ्रिकन देश युगांडामध्ये स्थायिक झाले होते. त्यानंतर 1960 च्या काळात पटेल कुटुंबीय ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. प्रीती यांच्या वडिलांचं नाव सुशील आणि आईचं नाव अंजना आहे. त्यांनी कील आणि एसेक्स विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलंय. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कंजर्वेटीव्ह पक्षाच्या मुख्य कार्यालयात नोकरी सुरुवात केली. यानंतर 1995 ते 1997 या काळात जेम्स गोल्डस्मिथ यांच्या पक्षासाठी प्रवक्ता म्हणून काम पाहिलं. प्रीती पटेल पुन्हा कंजर्वेटीव्ह पक्षासोबत जोडल्या गेल्या आणि महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

प्रीती पटेल पहिल्यांदा 2005 मध्ये नॉटिंघमच्या खासदार होण्यासाठी निवडणूक लढल्या, पण त्यांचा पराभव झाला. 2010 मध्येच त्यांनी विटहॅममधून निवडणूक जिंकली. 2014 मध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आणि 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. इस्रायल दौऱ्याच्या वादानंतर त्यांच्याकडे असलेलं आंतरराष्ट्रीय विकास मंत्रीपदही सोडावं लागलं.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.