Corona | आईपासून पाच मुलांना कोरोना संसर्ग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने झारखंडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona | आईपासून पाच मुलांना कोरोना संसर्ग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 5:39 PM

रांची : संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकलं आहे (Mother And Five Sons Died Due To Corona). कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, तरीही अनेकांना अद्यापही याचं गांभीर्य कळलेलं नाही. अजूनही अनेकजण कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाही. कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने झारखंडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंड येथील कोयलानगरी धनबादमध्ये एका चुकीमुळे हसतं-खेळतं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकलं. या कुटुंबातील आईसह पाच मुलांचा कोरोनाने जीव घेतला आहे. केवळ 17 दिवसांच्या आत या कुटुंबातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Mother And Five Sons Died Due To Corona) झाला.

चौधरी कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

धनबादच्या कतरासमध्ये राहणाऱ्या चौधरी कुटुंबासाठी कोरोना काळ बनला. कोरोनाने चौधरी कुटुंबातील सहा जणांचा बळी घेतला. झारखंडच्या रिम्समध्ये दाखल असलेल्या चौधरी कुटुंबातील पाच मुलांचा मृत्यू झाला. या कुटुंबात कोरोनामुळे पहिला मृत्यू 4 जुलैला झाला होता. या पाच मुलांच्या 90 वर्षीय आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

चौधरी कुटुंबातील सर्वात वृद्ध महिलेने कोरोनाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष केलं. त्या 27 जूनला नातवाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेल्या. दिल्लीवरुन परतल्यानंतर या 90 वर्षीय वृद्धेची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या वृद्धेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. मात्र, उपचाराअंती 4 जुलैला या वृद्धेचा मृत्यू झाला (Mother And Five Sons Died Due To Corona).

आईच्या अंत्यसंस्कारावेळी ICMR च्या निर्देशांकडे दुर्लक्ष

कोरोनामुळे वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबाने ICMR च्या निर्देशांचं पालन न करता सामान्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरला. त्यामुळे या वृद्धेच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली.

कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा मृत महिलेच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या आणखी दोन मुलांना संसर्ग झाला. मात्र, या दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पाचव्या मुलालाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. या महिलेचा सहावा मुलगा सध्या दिल्लीमध्ये आहे.

Mother And Five Sons Died Due To Corona

संबंधित बातम्या :

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.