AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं रिलीज

खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं 'अंजाना' रिलीज झालं आहे (Mimi Chakraborty first hindi song). या गाण्याला मीमी चक्रवर्तीने 'क्रिएशन्स' नावाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. हे गाणं राजीव दत्ता आणि सोहम मजूमदार यांनी लिहिलं आहे. तर मीमी चक्रवर्तीने स्वत: हे गाणं म्हटलं आहे

खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं रिलीज
| Updated on: Sep 24, 2019 | 11:51 PM
Share

मुंबई : खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं ‘अंजाना’ रिलीज झालं आहे (Mimi Chakraborty first hindi song). या गाण्याला मीमी चक्रवर्तीने ‘क्रिएशन्स’ नावाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. हे गाणं राजीव दत्ता आणि सोहम मजूमदार यांनी लिहिलं आहे. तर मीमी चक्रवर्तीने स्वत: हे गाणं म्हटलं आहे (Mimi Chakraborty Anjana song). 3 मिनिट 13 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये फक्त आणि फक्त मीमीचं दिसते. तिला कधी डर्ट बाईकिंग करताना दाखवलं आहे, तर कधी सुंदर ठिकाणी आपल्या अदा दाखवताना ती दिसते आहे (Mimi Chakraborty first hindi song). 22 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या गाण्याला तीन दिवसांत 5 लाख लोकांनी पाहिलं आहे.

हे गाणं ड्रीम्स नावाच्या अल्बमचा भाग आहे. “हे गाणं माझ्या स्वप्नांबाबत आहे. माझं पहिलं गाणं ‘अंजाना’ आहे, हे माझ्यातील अनोळखी गोष्टींचा शोध घेण्याबाबत आहे. मी एका म्यूजिकल फॅमिलीतून येते, त्यामुळे मला गाणं हे आधीपासून आवडतं. हे माझ्यासाठी माझा तणाव कमी करण्याचं काम करतं. ज्या गाण्यातून माझं पदार्पण झालं होतं ते गाणं लोकांना फार आवडलं होतं. त्यानंतर हिंदीमध्ये येण्याची ही योग्य वेळ आहे, असं मला वाटतं”, अशी माहिती मीमी चक्रवर्तीने इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत दिली.

या गाण्यासोबतच मीमीने तिचं युट्यूब चॅनललही लाँच केलं. दुर्गा पुजा दरम्यान ती आणखी एक गाणं लाँच करेल, असंह तिने सांगितलं. ते गाणं दुर्गा उत्सावावर असेल.

मीमच्या या गाण्याला युट्यूबवर मिश्रित कमेंट्स मिळत आहेत. एकीकडे तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांनी या गाण्याबाबत नकारात्मक कमेंट दिले आहेत.

“संगीत चांगलं आहे पण गाण्याचे शब्द निरर्थक आहेत. हिंदी आणि इंग्रजीचे उच्चार बंगाली भाषेशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे कृपया बंगालीतच गाण्याचा प्रयत्न करा”, अशी कमेंट एका युझरने केली.

राजीव दत्ता आणि सोहम मजूमदार यांनी लिहिलेले आणि डब्बू यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचं चित्रीकरण इस्तांबूलमध्ये  करण्यात आलं आहे. बाबा यादव यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मीमी चक्रवर्ती खासदार म्हणून निवडून आली. काहीच दिवसांपूर्वी खासदार नुसरत जहां आणि मीमी चक्रवर्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. नवरात्रीनिमित्त या दोन्ही अभिनेत्रींचा एक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्या थिरकताना दिसल्या. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकांच्य़ा पसंतीस पडला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.