खासदार नवनीत राणांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची झाडाझडती

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील चिखलदरा येथे सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली

खासदार नवनीत राणांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची झाडाझडती


अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील चिखलदरा (MP Navneet Rana At Chikhaldara) येथे आढावा बैठक भेटीदरम्यान सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. दरम्यान, चिखलदरामध्ये सुरु असलेलं काम निकृष्ट दर्जाचं असून यासाठी अवैध स्टोन क्रशर वापरण्यात येत असल्याचं, तसेच अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरु असल्याचे खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे हे स्टोन क्रशर चिखलदराच्या काँग्रेस नगराध्यक्षा विजया सोमवंशी यांच्या पतीचं आहे.

खडीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या कामात (MP Navneet Rana At Chikhaldara) जास्त तफावत असल्याचे खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. सिडकोच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याने नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं.

चिखलदरा येथील विकास आराखडा हा पर्यटकांच्या सोयीचा आराखडा असावा, अशा सूचना आमदार रवी राणा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ म्हणजेच ‘चिखलदरा’. चिखलदरा प्रवेशासाठी एक विशेष रस्ता बनवण्यात येत आहे. 5 किमीच्या या रस्त्यासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे आहे. चिखलदरा हे व्याघ्र संरक्षण प्रकल्प, तसेच पर्यटन स्थळ आहे. मात्र, असे असताना देखील या ठिकाणी स्टोन क्रशर आणि रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरु आहे.

चिखलदराच्या काँग्रेस नगराध्यक्षा विजया सोमवंशी याचे पती राजेंद्र सोमवंशी यांचे हे स्टोन क्रशर आहे. या स्टोन क्रशरला कुठलीही परवानगी नाही. याबाबत सिडकोचे अभियंता जामकर यांना विचारले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडावीची उत्तरं दिली. मात्र, अखेर हे स्टोन क्रशर आणि मुरुम उत्खननासाठी (MP Navneet Rana At Chikhaldara) कुठलीही परवानगी नसल्याचं त्यांनी मान्य केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI