AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणीसाठी एसटी प्रवाशांवर गदा, या आगारातील सर्व फेऱ्या रद्द

मुख्यमंत्री बहिण माझी लाडकीचे श्रेय घेण्यावरुन महायुतीत एकीकडे हमरी तुमरी सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतू या योजनेच्या धडाक्यात प्रचार करण्यासाठी एसटी महामंडळाच्या प्रवाशांवरही संक्रात येणार आहे.

लाडक्या बहिणीसाठी एसटी प्रवाशांवर गदा, या आगारातील सर्व फेऱ्या रद्द
| Updated on: Aug 21, 2024 | 8:34 AM
Share

‘मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी’ योजनेचे पैसे तर बहि‍णींच्या बॅंक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना भाजपाला प्रचंड मताधिक्य देऊन गेली आहे. या योजनेमुळे आता राज्य सरकारने निवडणूकांत प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. या लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत दोन उपमुख्य मंत्री आणि एका मुख्यमंत्री यांच्या जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकांत ह्या बहि‍णींची ओवाळणी कोणाला मिळते यावर राज्यात पुढील सरकारचा ‘किंगमेकर’ कोण असणार ? हे ठरणार आहे. मात्र आता लाडकी बहिणी योजनेसाठी राज्य वाहीनी एसटी महामंडळाच्या गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी अनेक एसटी बसेसना भाडे करारावर देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांचे वांदे होणार आहेत.

‘मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी’ या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचा फायदा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळतोय हे पाहाताच भाजपात अस्वस्थता पसरली. त्यानंतर या योजनेच्या नावाची ‘मुख्यमंत्री’हा शब्द वगळून भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रचार सुरु केला. पुणे येथे ‘मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी’ या योजनेच्या शुभारंभ करण्याचा कार्यक्रम तीन पक्षांच्या नेत्यांनी एकत्रपणे पुणे येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात तीन पक्षाचे नेते आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबईत काल मेळावा घेतला. या मेळाव्यात  मुख्यमंत्री शब्द वगळून या योजनेचे नाव पोस्टरवर ‘माझी बहिण लाडकी’ असे  करीत गुलाबी जाकीट घालून अजितदादांनी मोठा मेळावा घेतला. या योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत आता मारामाऱ्या सुरु झाल्या आहेत.

एसटी बंद असल्याने प्रवाशांना फटका

रत्नागिरी येथे 21 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन मुरुड आगारातील राज्य परिवहन मुरुड आगारातील राज्य परिवहनाच्या बसेस पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे 20 ते 21 ऑगस्ट रोजीच्या मुरुड आगारातून सुटणाऱ्या मुंबई, बोरीवली,कल्याण, धुळे, स्वारगेट, शिर्डी, ठाणे, पनवेल तसेच भांडुप या मार्गावरील बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.