Nagpur Fire | नागपुरात फर्निचर कंपनीमध्ये भीषण आग, प्लायवूडमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे

अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

Nagpur Fire | नागपुरात फर्निचर कंपनीमध्ये भीषण आग, प्लायवूडमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे


नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीतील (Hingana MIDC) कंपनीला भीषण आग लागलीय. फर्निचरच्या कंपनीला लागलेली ही आग वेगानं पसरल्यानं मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय. औद्योगिक वसाहतीतच आग लागल्यानं आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झालाय. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. (Nagpur Hingana MIDC Fires At Furniture Company)

नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीमधील स्पेस वूड कंपनीला ही भीषण आग लागलीय. साधारणतः 12 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि टँकर घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लाय वूड तयार होत असल्यानं इथे मोठ्या प्रमाणात लाकूड आहे. आग भडकत असून, तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्रयत्नशील आहेत.

हिंगणा एमआयडीसीमधील नित्यानंद उद्योग कंपनीला भीषण आग

गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा हिंगणा एमआयडीसीमधील नित्यानंद उद्योग कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती. ही कंपनी एसटी वर्कशॉपनजीक होती. या कंपनीमध्ये प्लास्टिक प्रोसेसिंग जॉब बनविले जात होते. ही कंपनी ऑर्डनस फॅक्टरीसाठी वेंडर म्हणून काम करते. आग आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसी, नागपूर महानगरपालिका व ऑर्डनन्स फॅक्टरी येथून अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज घटनास्थळी दाखल असलेले पोलीस अधिकारी पुरुषोत्तम राऊत यांनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

चारकोपमध्ये साई मंदिराला आग लागली नाही, लावली; हत्याप्रकरणाचा धक्कादायक उलगडा

मुंबई-पुणे हायवेवर चालत्या लक्झरी बसला आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI