नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

नागपुरातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला (Nagpur Satranjipura Corona Hotspot) आहे.

नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत (Nagpur Satranjipura Corona Hotspot) आहे. नागपुरातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. या भागात आतापर्यंत सर्वाधिक 80 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागातील अनेकांना क्वारंटाईन करुन त्यांची तपासणी केली जात आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा भागातील 450 लोकांना क्वारंटाईन करण्यात (Nagpur Satranjipura Corona Hotspot) आलं आहे. तर येत्या काही दिवसात आणखी 1000 ते 1200 जणांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. हे सर्वजण सतरंजीपुरा भागात मृत्यू झालेल्या 68 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.

सतरंजीपुरा हा नागपूरचा हॉटस्पॉट ठरल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. या भागातील प्रत्येक व्यक्तीची महापालिकेच्या वतीनं आरोग्य तपासणी केली जाते.

मात्र, काहीजण या आरोग्य तपासणीला सहकार्य करत नाही. त्यामुळं त्यांना क्वारंटाईन केलं जातं आहे. काल (27 एप्रिल) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती

तर दुसरीकडे नागपुरात 8 जणांना कोरोनावर मात केली आहे. यात काल दुपारी 6 जणांना, तर संध्याकाळी 2 जणांना डिस्चार्ज मिळाला. यापैकी सहा जण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. दरम्यान नागपुरात आतापर्यंत 127 जणांना कोरोनाची लागण झाली (Nagpur Satranjipura Corona Hotspot) आहे.

संबंधित बातम्या : 

स्पेशल रिपोर्ट : अहमदनगरमधील जामखेड कोरोनाचे हॉटस्पॉट कसं बनलं?

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात एकही रुग्ण नाही

Published On - 8:57 am, Tue, 28 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI