नागपूर अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी, कोरोना संकटात सरकारची आर्थिक उधळपट्टी?

कोरोनामुळे सध्या आर्थिक संकट आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे. (Nagpur winter session Repairing work in MLA Residence)

नागपूर अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी, कोरोना संकटात सरकारची आर्थिक उधळपट्टी?

नागपूर : येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निवासात डागडुजी करण्यात येणार आहे. या डागडुजी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यंदा या डागडुजीकरणासाठी जवळपास आठ कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना काळात आधीच आर्थिक अडचणी असतानाही ही उधळपट्टी का केली जाते, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. (Nagpur winter session Repairing work in MLA Residence)

नागपुरात सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे.

तसेच आमदार निवासात काही डागडुजीची कामंही सुरु झाली आहेत. ज्या आमदार निवासात अधिवेशनादरम्यान मोजकेच आमदार राहतात, त्या निवासावर दरवर्षी रंगकाम आणि इतर खर्च का करावा लागतो? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आर्थिक संकटात ही उधळपट्टी का सुरु आहे, असा प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत.

आर्थिक संकटामुळे राज्य सरकारकडे वेतन देण्यासाठीही पैसे नाही, अशी स्थिती आहे, असं असतानाही यंदा आमदार निवासाच्या डागडुजीवर आणि पेंटिंगवर साधारण आठ कोटींचा खर्च होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या डागडुजीची कामंही सुरु झाली आहे. अधिवेशनासाठी नाही, तर जुनीच मंजुर काम करत असल्याचं PWD च्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण आर्थिक संकटामुळे सरकारनं अनेक मंजूर कामांचा निधी परत बोलावला. मग आमदार निवासावर इतकी मेहरबानी का? असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो आहे. (Nagpur winter session Repairing work in MLA Residence)

संबंधित बातम्या : 

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?