आणि नांदेड विमानतळावर इंदिरा गांधींच्या नावाची पाटी झळकली!

नांदेडच्या 'श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज' विमानतळावर 'इंदिरा गांधी विमानतळ' नावाची पाटी झळकल्यामुळे शहरात एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं

आणि नांदेड विमानतळावर इंदिरा गांधींच्या नावाची पाटी झळकली!

नांदेड : नांदेडमधील विमानतळाच्या नावाची पाटी रातोरात बदलल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. नांदेडमधील विमानतळाचं अचानक नामांतर झाल्याच्या अफवेमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. परंतु चित्रपटाच्या शूटिंगसाठी पाटी बदलल्याचं समोर आलं आणि ‘घोळनाट्या’वर पडदा पडला. (Nanded Airport Indira Gandhi Name)

नांदेड शहरातील विमानतळाला शीख धर्माचे दहावे गुरु ‘श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज’ यांचं नाव दिलेलं आहे. परंतु काल (रविवार 23 फेब्रुवारी) रात्री या विमानतळावर ‘इंदिरा गांधी विमानतळ’ या नावाची पाटी झळकली.

ही माहिती काही क्षणातच नांदेड शहरभर पोहचली आणि शीख समाजातील तरुणांनी विमानतळावर गर्दी केली. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा – सोशल मीडियावरुन मैत्री, नंतर प्रेम, जळगावचा शेतकऱ्याचा मुलगा थेट अमेरिकेचा जावई

विमानतळाचं नाव बदलण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला होता. पण एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी विमानतळावर इंदिरा गांधी यांचं नाव लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं.

गुरु महाराजांचं नाव हटवण्यात आल्याने शीख तरुणांनी रोष व्यक्त केला. अखेरीस इंदिरा गांधी यांच्या नावाची पाटी हटवण्यात आली आणि तणाव निवळला. (Nanded Airport Indira Gandhi Name)

नांदेडमधील श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज नागरी विमानतळाचं उद्घाटन ऑक्टोबर 2008 मध्ये तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI