सोशल मीडियावरुन मैत्री, नंतर प्रेम, जळगावचा शेतकऱ्याचा मुलगा थेट अमेरिकेचा जावई

जळगावचा सॉफ्टवेअर अभियंता तरुण योगेश माळी यांनी थेट अमेरिकेच्या तरुणीसोबत लग्न केलं (farmer boy wedding with american girl) आहे.

  • Publish Date - 4:22 pm, Sun, 23 February 20 Edited By:
सोशल मीडियावरुन मैत्री, नंतर प्रेम, जळगावचा शेतकऱ्याचा मुलगा थेट अमेरिकेचा जावई

जळगाव : जळगावचा सॉफ्टवेअर अभियंता तरुण योगेश माळी यांनी थेट अमेरिकेच्या तरुणीसोबत लग्न केलं (farmer boy wedding with american girl) आहे. आज (23 फेब्रुवारी) या दोघांचे लग्न जळगावात थाटामाटत पार पडले. सोशल मीडिया या दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोघांनी आज भारतीय रितीरिवाजाप्रमाणे सात फेरे घेऊन विवाह बंधनात (farmer boy wedding with american girl) अडकले.

जळगावातील योगेश विठ्ठल माळी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असताना सोशल मीडिया साइटवर त्याची ऍना रेनवॉल अमेरिकेतील तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ऍना त्याच्या कुटुंबीयांसह जळगावला आली असून भारतीय संस्कृती प्रमाणे आज दोघांनी विवाह केला.

योगेश विठ्ठल माळी या तरुणाने प्राथमिक शिक्षण विद्यानिकेतन शाळेतून, महाविद्यालयीन शिक्षण एम.जे. कॉलेज येथून तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्याच्या शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. योगेश “एमएस इन कॉम्प्युटर’चे शिक्षण पूर्ण केल्यावर अमेरिकेत सॉफ्ट इन्फोनेट फार्मा या कंपनीत नोकरीला लागला.

जॉब करत असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत ऍना रेनवालशी ओळखी होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. भारतीय संस्कृतीचे कुतूहल असल्याने ऍना लग्नासाठी जळगावला आली.

पहिल्यांदाच सासू सुभद्रा, सासरे विठ्ठल माळी, दीर प्रशांत, नणंद कांचन जगदीश महाजन अशा कुटुंबीयांची गाठ भेट घडली. मराठी मुलींप्रमाणे ऍनाने भारतीय परंपरेनुसार राहणीमानात बदल केला असून, चुडीदार दुपट्टा, कपाळावर टिकली लावून कुटुंबीयांत वावरत आहे. अपार्टमेंटमधील रहिवशांतर्फे आलेल्या आमंत्रणाला वधू-वर जोडीने हजर राहून आशीर्वाद घेत आहेत.