ऐन दिवाळीत सोनाराची दुकानात घुसून हत्या, भाजप कार्यकर्त्याला अटक

| Updated on: Oct 30, 2019 | 8:21 AM

धनत्रयोदशीला 55 वर्षीय रवींद्र चक्रवार यांची ज्वेलरी शॉपमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे

ऐन दिवाळीत सोनाराची दुकानात घुसून हत्या, भाजप कार्यकर्त्याला अटक
फोटो : आरोपी भीम कोतवाल यादव
Follow us on

नांदेड : नांदेडमध्ये सोनार रवींद्र चक्रवार यांच्या हत्येप्रकरणी (Nanded Jeweler Murder Case) भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भीम कोतवाल यादव याने 25 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसात चक्रवार यांची दुकानात शिरुन हत्या केली होती.

आरोपी भीम कोतवाल यादव हा भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे. आरोपीने कुठलाही पुरावा मागे न ठेवल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र अवघ्या तीन दिवसात हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. शोधमोहीम राबवत पोलिसांनी भीम कोतवाल यादवला बेड्या ठोकल्या.

यादवला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात 55 वर्षीय रवींद्र चक्रवार यांच्या हत्येचं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय झालं होतं?

नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून खंडणीसाठी व्यापाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. नांदेड शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या रवींद्र चक्रवार यांचं जुन्या नांदेड शहरातील सराफा बाजारात गुरुकृपा ज्वेलर्स नावाचं दुकान आहे.

ज्वेलर्सची दुकानं नेहमी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु असतात. शुक्रवारी धनत्रयोदशीच्या निमित्ताने ग्राहकांची गर्दी असल्यामुळे काही दुकानं उशिरापर्यंत सुरु होती. त्यातच मुसळधार पाऊसही सुरु होता. नऊ वाजताच्या चक्रवार यांच्या दुकानात काही जणांनी प्रवेश केला. दुकानात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर सोबत नेल्याने पोलिसांना धागेदोरे लागत नव्हते.

दुकानाचं शटर बंद करुन प्रेयसीचा गळा चिरला, हत्येनंतर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

वडील रात्री अकरा वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे चक्रवार यांच्या मुलाने मोबाईलवर फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तो दुकानात गेला. शटर बंद दिसल्याने त्याने शटर उघडताच रवींद्र चक्रवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

या ठिकाणी अनेक सराफा व्यापाऱ्यांनी गर्दी केली. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. दुकानात 9 लाख 50 हजारांचा ऐवज जागेवर असल्यामुळे हत्येचं नेमकं कारण (Nanded Jeweler Murder Case) काय, या संभ्रमात पोलिस पडले होते.