Nanded | छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला नांदेडमध्ये समर्थन, टायर जाळून सरकारचा निषेध, उद्या नांदेड बंदची हाक!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी नांदेडमधील सर्व बाजारपेठा आणि दुकाने, व्यापारी संकुल उद्या बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nanded | छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला नांदेडमध्ये समर्थन, टायर जाळून सरकारचा निषेध, उद्या नांदेड बंदची हाक!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 12:28 PM

नांदेडः छत्रपती संभाजी राजे भोसले (Chatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरु केले असून त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. नांदेडमध्येही (Nanded Agitation) मराठा सामाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. नांदेडमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी हैदराबाद हायवेवर टायर जाळून सरकारचा निषेध केला. मारतळा गावाजवळ आंदोलकांनी रस्त्यावर हा निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी सकाळीच हायवेवर टायर जाळल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

उद्या नांदेड बंदची हाक

दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून उद्या नांदेड बंद ठेवण्याचा निर्णय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी नांदेडमधील सर्व बाजारपेठा आणि दुकाने, व्यापारी संकुल उद्या बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nanded Band

उपोषणाचा तिसरा दिवस, शिष्टाईचे प्रयत्न सुरु

मराठा आरक्षणाला मंजुरी मिळण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले हे 26 फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजी राजे यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून तरुण मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजी राजे भोसले यांची आझाद मैदानावर भेट घेतली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतरही ते उपोषणावर ठाम होते. दरम्यान, आज सकाळी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी होणार आहे. यावेळी छत्रपती स्ंभाजी जारे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. या बैठकीत राज्य सरकार काय प्रस्ताव देणार, राज्य सरकारची शिष्टाई परिणाम करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या-

Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारकडून छत्रपती संभाजी राजेंना चर्चेचे निमंत्रण; शिष्टाईचे प्रयत्न सुरू

बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.