पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परभणीच्या विद्यार्थ्याला पत्र, मोदींच्या पत्रानं विद्यार्थ्यासह कुटुंबीय भारावले

Yuvraj Jadhav

|

Updated on: Nov 30, 2020 | 12:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी शहरातील वैभवनगर येथील अजय डाके या विद्यार्थ्याच्या कलागुणांचे कौतूक केले आहे. Narnedra Modi Ajay Dake

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परभणीच्या विद्यार्थ्याला पत्र, मोदींच्या पत्रानं विद्यार्थ्यासह कुटुंबीय भारावले

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी परभणी शहरातील वैभवनगर येथील बालविद्या मंदिर मध्ये इयत्ता सहावीत शिकणार्‍या अजय डाके (Ajay Dake) या विद्यार्थ्याच्या कलागुणांचे कौतूक केले आहे. नरेंद्र मोदींनी अजय डाकेला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अजयने सहज सुचले म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना पत्र पाठवले होते. पत्रासोबत पंतप्रधानांचे स्वत: काढलेले पेन्सिल स्केच पाठवले. या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्राद्वारे उत्तरही आले. हे स्केच खूप आवडल्याचे मोदींनी आपल्या पत्रात लिहिलय.स्वप्नवत वाटणारी ही घटना प्रत्यक्षात उतरल्याने अजयच्या कुटुंबालाही आश्चर्य वाटले आणि सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही. (Narendra Modi wrote letter to Ajay Dake and appreciate  his art of painting)

अजयला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पंतपधान नरेंद्र मोदी यांचे रेखाचित्र काढून त्यांना पाठवले होते.ते चित्र पंतप्रधान मोदी यांनी पाहिले.चित्रकलेचे पंतप्रधानांनी मुक्तकंठाने कौतूक करत, ‘चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते.या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भूत आहे’ असेही पत्रात नमूद केले आहे. (Narendra Modi wrote letter to Ajay Dake and appreciate  his art of painting)

Ajay Dake

चित्रकलेतून सामाजिक प्रश्न मांडण्याचा सल्ला

पंतप्रधान मोदींनी अजय डाकेला लिहिलेल्या पत्रात तुझ्या कलाकृतीबरोबरच, पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करत असल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला, की तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. अजय यानं कलेच्या माध्यमातून मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्यांप्रती सजग करण्याचा प्रयत्न करशील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अजयने नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात चित्रं काढण्याची मोठी आवड असल्याचं लिहिलं होतं. चित्रकलेबाबतचे आपले विश्व काही वेगळेच आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो.भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचे अजयने आपल्या पत्रात नमूद केले होते.

सुट्टीच्या काळात मुलगा अजय डाके यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र काढले होते. ते मोदींना पाठवले होते. अजयनं पाठवलेलं पत्र आणि चित्र मोदींना आवडल्यानं त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं त्याचा आम्हाला आनंद झाला, असं जितेंद्र डाकेंनी सांगितले. (Narendra Modi wrote letter to Ajay Dake and appreciate  his art of painting)

संबंधित बातम्या 

“गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस” वाढदिवसानिमित्त मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा, अनेक आजारांवरील लस निर्मितीमध्ये ‘सीरम’चं मोठं योगदान

(Narendra Modi wrote letter to Ajay Dake and appreciate  his art of painting)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI