नासाच्या ‘मार्स लँडर’चं मंगळावर यशस्वी लँडिंग

मुंबई : नासाचं ‘रोबोटीक मार्स लँडर’ सोमवारी रात्री 1.24 वाजता मंगळ ग्रहाच्या जमीनीवर यशस्वीपणे उतरलं. सात महिन्यांच्या प्रवासानंतर नासाचं मार्स लँडर हे मंगळावर अखेर उतरलं आहे. 62,000 मैल प्रति तासाच्या गतीने इनसाइटने 301,223,981 मैल इतका प्रवास केला. ‘पहिल्यांदा दोन एक्सपेरिमेंटल सॅटेलाइटने स्पेसक्राफ्टचा पाठलाग करत त्यावर नजर ठेवली’, असे नासाने सांगितले. हे दोन्ही सॅटेलाइट या स्पेसक्राफ्टच्या […]

नासाच्या ‘मार्स लँडर’चं मंगळावर यशस्वी लँडिंग
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : नासाचं ‘रोबोटीक मार्स लँडर’ सोमवारी रात्री 1.24 वाजता मंगळ ग्रहाच्या जमीनीवर यशस्वीपणे उतरलं. सात महिन्यांच्या प्रवासानंतर नासाचं मार्स लँडर हे मंगळावर अखेर उतरलं आहे. 62,000 मैल प्रति तासाच्या गतीने इनसाइटने 301,223,981 मैल इतका प्रवास केला.

‘पहिल्यांदा दोन एक्सपेरिमेंटल सॅटेलाइटने स्पेसक्राफ्टचा पाठलाग करत त्यावर नजर ठेवली’, असे नासाने सांगितले.

हे दोन्ही सॅटेलाइट या स्पेसक्राफ्टच्या सहा हजार मैल मागे चालत होते. नासाने याच वर्षी 5 मे ला कॅलिफोर्नियाच्या वंडेनबर्ग एअरफोर्स स्टेशनहून अॅटलस वी रॉकेटच्या माध्यमातून ‘रोबोटीक मार्स लँडर’ला लाँच केले होते.

इनसाइटला मंगळावर उतरण्यासाठी सहा ते सात मिनिटांचा कालावधी लागला, जो अतिशय महत्वाचा ठरला. यावेळी याचा पाठलाग करत असलेल्या दोन्ही सॅटेलाइटच्या मदतीने जगभरातील वैज्ञानिक यावर लक्ष ठेवून होते. इनसाइट ज्यावेळी मंगळावर यशस्वीरित्या उतरले तेव्हा सर्व वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. डिस्नेचे दोन पात्र ‘वॉल-ई’ आणि ‘ईव्ह’ अशी या सॅटेलाइटची नावं आहेत. या सॅटेलाइट्सने आठ मिनटांत इनसाइट मंगळ ग्रहावर उतरल्याची माहिती दिली. नासाने या  मिशनचं लाईव्ह कव्हरेज केलं.

इनसाइटचे काम काय ?

इनसाइट मंगळ ग्रहावरील सुदूर परिसरात भूमिगत संरचनेचं अध्ययन करणार आहे. तसेच भूकंपामुळे निर्मीत होणाऱ्या सिस्मीक वेवने मंगळाचे आंतरीक नकाशे तयार केले जातील.

मंगळ ग्रह कसा आहे ?

मंगळ ग्रह हा बऱ्याच बाबतीत पृथ्वीसारखा आहे. दोन्ही ग्रहांवर डोंगर आहेत. पृथ्वीच्या तुलनेत मंगळाची रुंदी अर्धी आहे, वजन एक तृतियांश आहे तर घनत्व 30 टक्क्यांनी कमी आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें