APMC Market | सात दिवसांनी एपीएमसी मार्केट उघडले, ग्राहकांअभावी माल तसाच पडून

| Updated on: May 18, 2020 | 6:47 PM

एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 11 मे ते 17 मे या कालावधीत सात दिवस मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

APMC Market | सात दिवसांनी एपीएमसी मार्केट उघडले, ग्राहकांअभावी माल तसाच पडून
Follow us on
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता (APMC Market Starts Again) प्रादुर्भाव पाहता 11 मे ते 17 मे या कालावधीत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि बाजार समितीच्या माध्यमातून घेण्यात आला होता. त्यानुसार, सात दिवस मार्केट बंद ठेवून आज मार्केट सुरु झाले आहे. मात्र, ग्राहक आणि मजूर नसल्याने भाजीपाला मार्केटमधील (APMC Market Starts Again) माल तसाच पडून आहे.
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आतापर्यंत 380 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये व्यापारी, माथाडी, मापाडी, कार्यालयीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ग्राहक, दलाल आणि निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये वाढता कोरोनाचा प्रसार रोखता यावा, त्या अनुषंगाने 11 मे ते 17 मे या कालावधीत सात दिवस मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आज सोमवारी 18 मेपासून मार्केट सुरु करण्यात आले आहे. (APMC Market Starts Again) आजपासून सुरु करण्यात आलेल्या मार्केटमध्ये भाजीपाला मार्केट, अन्नधान्य मार्केट, मसाला मार्केट यांचा समावेश आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये 92 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र बाजार समितीत माल उचलण्यासाठी मजूर आणि माल घेण्यासाठी ग्राहक नसल्याने बाजार समितीमध्ये कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आणि इतर भाज्या तशाच पडून आहेत.
तसेच, खूप दिवसांनी मार्केट सुरु झाल्यानंतर बाजार समितीकडून काळजी घेण्यात येत असून मार्केटच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या ग्राहकांची स्क्रिनिंग टेस्टिंग करण्यात येत आहे. आतापर्यंत 1,999 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दहा जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची रवानगी रुग्णालयात (APMC Market Starts Again) करण्यात आली.
संबंधित बातम्या :
Malegaon Corona | मालेगावात नवे कोरोनाग्रस्त घटले, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ
Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घट
लॉकडाऊनमध्ये कोकणच्या पोरांची आयडिया, ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं
Raigad corona update : रायगडमध्ये 24 तासात 38 नवे रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 518 वर