Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

| Updated on: May 03, 2020 | 9:28 PM

नवी मुंबईतही आज दिवसभरात 25 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 314 वर येऊन पोहोचली आहे.

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार
Follow us on

नवी मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस (Navi Mumbai Corona Patients) वाढत चालली आहे. राज्यात दररोज नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. नवी मुंबईतही आज दिवसभरात 25 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 314 वर येऊन पोहोचली आहे. दुसरीकडे, आज नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सर्व व्यापारी आणि कामगारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 59 जणांना कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा (Navi Mumbai Corona Patients) वाढण्याची भीती आहे.

नवी मुंबईत आज 25 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या नवी मुंबईत 314 कोरोनाबाधित आहेत. 25 पैकी 5 जण हे एपीएमसीमधील आहेत. त्यामुळे सध्या एपीएमसीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 53 वर पोहोचली आहे.

नवी मुंबईत कुठे किती नवे रुग्ण?

  • वाशी – 9
  • नेरुळ – 9
  • कोपरखैरणे – 5
  • तुर्भे – 1
  • ऐरोली – 1

एपीएमसीत 5 हजार जणांची कोरोना तपासणी, 59 जणांमध्ये लक्षणं 

एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये नवी मुंबई महापालिका, तेरणा आणि डी. व्हाय. पाटील रुग्णालयातील 30 वैद्यकीय टीमने जवळपास 4,500 ते 5,000 जणांची तपासणी केली. यामध्ये परप्रांतीय कामगार, एपीएमसी कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली. यामध्ये 59 जणांना कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात (Navi Mumbai Corona Patients) आले आहेत.

एपीएमसी कोरोनाचं नवं हॉटस्पॉट, 53 जणांना संसर्ग

एपीएमसी मार्केट हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट बनलं आहे. येथील पाच बाजारपेठांमध्ये 53 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शासनाच्या आदेशामुळे या बाजारपेठेतील पाचही घाऊक बाजार सुरु आहेत.

एपीएमसीमधील एका व्यापाऱ्याला आणि एका सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. ही बातमी उघड होताच बाजारातील सर्वांचे धाबे दणाणले. कारण तो व्यापारी अनेक व्यापारी, अधिकारी, ग्राहकांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर एपीएमसी मार्केटमधील तब्बल 53 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्यापारी, कर्मचारी, कामगार, माथाडी, मापाडी आणि वाहतूकदारांमध्ये भीती पसरलेली आहे.

राज्यात 12 हजार 296 कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात 2 मे रोजी दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, काल राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Navi Mumbai Corona Patients

संबंधित बातम्या :

वरळीनंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर

Lockdown : सहा दिवस पायपीट करुन परतलेल्या मजुरांना जंगलात क्वारंटाईन, वाशिममधील ग्रामपंचायतचा प्रताप

राज्यात जीवनावश्यक नसलेल्या दुकानांना सशर्त परवानगी, मुंबई-पुण्यातील निर्बंध कायम

‘नागरिकांना रुग्णालयात बेड नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगितलं जातंय’, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र