अमरावतीकरांनी स्वतःला 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

अमरावतीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहरात आज पुन्हा 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Amravati Collector appeal to people).

अमरावतीकरांनी स्वतःला 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 4:15 PM

अमरावती :कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Amravati Collector appeal to people). कोरोनाच्या विळख्यातून वाचायचं असेल तर अमरावतीकरांनी स्वत:ला 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन करुन घ्यावं”, असा सल्ला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे. अमरावतीत दररोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत (Amravati Collector appeal to people).

“अमरावती शहरात आजदेखील 2 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा आता 55 वर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावं”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

“अमरावती जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं उघडी राहिली तर कारवाई केली जाईल. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणखी कडक करण्यात येतील”, असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं.

“कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा तब्येत बघिडली तर तात्काळ सांगा म्हणजे तातडीने उपचार करता येईल. सध्याच्या कठीण परिस्थतीत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं”, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

अमरावतीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहरात आज पुन्हा 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात खोलापुरी गेट येथे येथील 62 वर्षीय महिलेचा आणि ताज नगर येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अमरावतीमधील कोरोनाबाधितांचा आकडा 55 वर पोहोचला आहे. तर 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमरावतीच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

अमरावतीत आतापर्यंत 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अमरावतीत 41 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, कोरोनाचा आकडा पन्नाशीच्या पार गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या :

पीपीई किट्स घातल्याने दहा तास उपाशी, अमित ठाकरेंकडून ‘मार्ड’च्या डॉक्टरांसाठी उच्च प्रथिनयुक्त आहाराची व्यवस्था

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, 361 पोलिसांना कोरोनाची लागण

पुण्याची रुग्णसंख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर, भवानी पेठेत 27 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.