छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर मोठा हल्ला, 14 जवान जखमी, 13 बेपत्ता

सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांकडून काल रात्री सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरु होतं (Naxal attack on CRPF and DRG). यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर मोठा हल्ला, 14 जवान जखमी, 13 बेपत्ता
चेतन पाटील

|

Mar 22, 2020 | 10:03 AM

छत्तीसगड : सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांकडून काल रात्री (21 मार्च) सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरु होतं (Naxal attack on CRPF and DRG). यावेळी नक्षलवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये असणाऱ्या 150 जवानांवर अचानक हल्ला केला. त्यामुळे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु झाली. या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले तर 14 जवान जखमी झाले आणि 13 जवान बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांसाठी शोध मोहिम सुरु आहे (Naxal attack on CRPF and DRG).

दरम्यान, पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक तासभर सुरु राहिली. पोलीस दलावर वाढता दबाव पाहून पोलिसांनी जिल्हा मुख्यालयी संपर्क साधला. त्यानंतर थोड्या वेळात घटनास्थळी पोलिसांचे हेलिकॉप्टर दाखल झाले. हवेत हेलिकॉप्टर बघताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात 14 जवान जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती नाजूक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व जखमी जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन वर्षांपूर्वीदेखील सुकमा जिल्ह्यातील बुर्कापाल जंगल परिसरातच 200 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ टीमवर हल्ला केला होता. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना बुर्कापाल जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें