राजकारणात चहा विकल्याचंही भांडवल केलं जातं; रोहित पवारांचा खोचक टोला
रोहित पवार मंगळवारी बारामतीमधील एका चहाच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळेचे फोटो ट्विट करून रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला. | Rohit Pawar

राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, असे म्हणत रोहित यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे अधुनमधून खोचक ट्विट करून भाजप नेत्यांना डिवचत असतात. ते मंगळवारी बारामतीमधील एका चहाच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळेचे फोटो ट्विट करून रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला.
- राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, असे म्हणत रोहित यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा मी लहानपणी चहाच्या स्टॉलवर काम करायचो, हे आवर्जून सांगतात. ही आठवण सांगताना ते भावूकही होतात.
- आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय. त्यांचं उदघाटन करुन शुभेच्छा दिल्या. इथल्या चहाची टेस्टही भन्नाट आहे, बरं का! ती घ्यायला तुम्हीही विसरु नका, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
- रोहित पवार यांनी माळेगावमध्ये आमदार’ या चहाच्या दुकानाचे उद्घाटन केले.
- इथल्या चहाची टेस्टही भन्नाट आहे, बरं का! ती घ्यायला तुम्हीही विसरु नका, हे रोहित पवार यांनी आवर्जून सांगितले आहे.






