गुगलमुळे मला भलतंच भाग्य, अमोल कोल्हेंचा सर्च इंजिनलाच चिमटा

Rohit Dhamnaskar

|

Updated on: Oct 18, 2020 | 2:28 PM

माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल ? | Amol Kolhe Google

गुगलमुळे मला भलतंच भाग्य, अमोल कोल्हेंचा सर्च इंजिनलाच चिमटा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना गुगलच्या चुकीमुळे रविवारी फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. गुगलच्या सर्चमध्ये अमोल कोल्हे यांचा वाढदिवस 18 ऑक्टोबरला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळपासून अमोल कोल्हे यांच्यावर चाहते आणि कार्यकत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. या सगळ्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत गुगलला शाब्दिक चिमटा काढला. (NCP MP Amol Kolhe birthday wrongly mentioned on Google search)

आज सकाळपासून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच. वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेजद्वारे, सोशल मिडियातून शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांचा ऋणी आहे.

परंतु Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी पडत नाही. बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही. सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल, असे अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता गुगल या प्रकाराची दखल घेऊन ही चूक सुधारणार का, हे बघावे लागेल.


इतर बातम्या:

रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं : खा. अमोल कोल्हे

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा, अमोल कोल्हेंची सरकारला विनंती

Amol Kolhe | महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत, अमोल कोल्हेंचा सवाल

(NCP MP Amol Kolhe birthday wrongly mentioned on Google search)

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI