Mukesh Khanna |  मुकेश खन्नांच्या ‘Me Too’ संबंधित वक्तव्यानंतर नेटकरी संतापले, ‘शक्तिमान’ सोशल मीडियावर ट्रोल!

Mukesh Khanna |  मुकेश खन्नांच्या ‘Me Too’ संबंधित वक्तव्यानंतर नेटकरी संतापले, ‘शक्तिमान’ सोशल मीडियावर ट्रोल!

मुकेश खन्नांच्या या वक्तव्यानंतर नोकरी करणाऱ्या महिलांनी आपली नाराजी वक्त केली आहे.

Harshada Bhirvandekar

|

Nov 01, 2020 | 2:57 PM

मुंबई : टीव्हीवरचा लाडका ‘शक्तिमान’ जो सगळ्या जगातला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायचा, तो आता सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे. ‘शक्तिमान’ साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. ‘मी टू’ (Me Too) प्रकारणावर बोलताना त्यांनी महिलांविषयी चुकीची टिप्पणी केल्याने सगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका होते आहे. त्याच बरोबर संतापलेल्या नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.(Netizens troll shaktiman fame actor mukesh Khanna over his controversial comment on me too)

‘मी टू’ प्रकरणावर भाष्य करताना अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांनाच चुकीचे ठरवले आहे. ते म्हणाले, ‘महिलांचे काम केवळ घर सांभाळणे होते. महिलांनी घराबाहेर पडून काम करायला सुरुवात केल्यावर हे ‘मी टू’ सारखे प्रकार घडायला लागले. आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याची वार्ता करतात’. त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे.

मुकेश खन्नांवर संतापले नेटकरी

मुकेश खन्नांच्या या वक्तव्यानंतर नोकरी करणाऱ्या महिलांनी आपली नाराजी वक्त केली आहे. यावर एका वापरकर्त्याने कमेंट केली की, ‘आणि याच प्रकारे या मूर्ख शक्तिमानने आपले समाजातील स्थान बळकट करायचा प्रयत्न केला. ते नेमके कोणत्या प्रकारच्या कुटुंबात वाढले असतील, याचे आश्चर्य वाटते. त्यांना कोणीतरी विचारा की 5-6 वर्षांच्या लहान मुलींवर का बलात्कार होतात? स्त्री शक्तीला घाबरणाऱ्या या कमजोर पुरुषांना कुठलाही मंच मिळता कामा नये,’ असे म्हणत आपला रोष व्यक्त केला.(Netizens troll shaktiman fame actor mukesh Khanna over his controversial comment on me too)

‘अशा घृणास्पद टिप्पणी मी आज पर्यंत कधीच ऐकली नाही. तुम्ही तुमच्याबद्दल असलेला सगळा सन्मान घालवून बसलात,’ असे म्हणत एका वापरकर्त्याने त्यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला.

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटावर टीका

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लक्ष्मीसमोर बॉम्ब हा शब्द लिहिणे ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. व्यावसायिक हितसंबंधांचा विचार करून हा खोडकरपणा करण्यात आला आहे. मग त्याला मंजुरी मिळावी का? अर्थात, अजिबात नाही. आपण ‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जिझस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकतो का? नाही ना? मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवता?’

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाविषयी आधीही असेच वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत मुकेश खन्नांनीही त्याच जुन्या तथ्यांचा आधार घेत या पोस्टमध्ये आपला रोष व्यक्त केला होता. चित्रपटांच्या नावाखाली हिंदूंचा अपमान करणाऱ्या प्रत्येक चित्रपट निर्मात्यावर त्यांनी टीका केली होती.

(Netizens troll shaktiman fame actor mukesh Khanna over his controversial comment on me too)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें