फक्त मुंबई-पुणे नाही, दिल्ली-गुजरातमधून न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात

मुंबई, पुणे, नाशिकसह दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेशातूनही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी रेलचेल (Konkan new year celebration) वाढली आहे.

फक्त मुंबई-पुणे नाही, दिल्ली-गुजरातमधून न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात

रत्नागिरी : कोकणाचं सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं. निळा क्षार समुद्र किनारा आणि किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटा आणि त्याचा आनंद….त्यामुळेच अनेक पर्यटक या ठिकाणी आकर्षित (Konkan new year celebration) होतात. यावर्षी नववर्षांचे स्वागत कोकणात सेलिब्रेशन करावं याचे बेत आखले गेले आहेत. त्यामुळे कोकणाचे किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. एमटीडीसी आणि खासगी रिसार्टची बुकिंगही फुल्ल झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेशातूनही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी रेलचेल (Konkan new year celebration) वाढली आहे.

नववर्षासाठी कोकण सध्या हाऊस फुल्ल झालं आहे. नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसेच गोव्यात जाण्याचे प्लॅन आखले जातात. मात्र यावर्षी पर्य़टकांनी कोकणाला जास्त पसंती दिली आहे. कोकणात जवळपास तीन लाख पर्यटक दाखल झाले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या कोकणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या कोकण हाऊस फुल्ल झालं आहे.

कोकणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी सध्या समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. निसर्गरम्य हिरवाई पर्य़टकांना खुणावते आहे. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलून गेले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बच्चे कंपनी सुद्धा सज्ज झाली (Konkan new year celebration) आहे.

वाँटर स्पोर्ट्स, समुद्रातील मजा-मस्ती अशात सध्या अनेक पर्यटक गुंतल्याचेही दिसत आहे. समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मजा सुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. गोवा आणि मुंबई यांच्या मध्यावर असलेल्या कोकणच्या सौंदर्याची भुरळ पर्यटकांना घालत आहे. त्यामुळे पर्य़टकांची पावलं आपसूकच कोकणच्या दिशेने वळताना दिसतात. त्यामुळे कोकणातलं निसर्गाचं सौदर्य पाहून अनेक पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी इथं राहण्याचा प्लँन करत आहेत. तर काही नवीन वर्षाचा संकल्प करताना पहायला मिळत (Konkan new year celebration) आहेत.

दरम्यान नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा सुट्या लागोपाठ आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक पर्यटकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. कोकणाच्या सौंदर्यावर भुरळ पडल्याने पर्यटकांनी कोकण हाऊसफुल्ल झालं आहे. त्यामुळे कोकणातील हे सेलिब्रेशन नवीन वर्षाची आठवण इथल्या पर्यटकाच्या मनात कायम राहणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI