cyber police | पुणे सायबर पोलिसांची कारवाई ; नायजेरियन नागरिकांना बँक खाते वापरास देणाऱ्यास दिल्लीतून केली अटक

cyber police | पुणे सायबर पोलिसांची कारवाई ; नायजेरियन नागरिकांना बँक खाते वापरास देणाऱ्यास दिल्लीतून केली अटक
संग्रहित छायाचित्र.

पुण्यात स्थायिक असलेल्या महिलेसोबत फेसबुकच्या माध्यमातून आरोपीनी महिलेशी ओळख निर्माण केली. पुढे त्या महिलेला इंटरनॅशनल फोनद्वारे संपर्क करुन महागडी भेटवस्तू पाठविल्याची बतावणी केली. मात्र परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोन्याचे दागिने व परदेशी चलन विमानतळावर कस्टमने अडवले असून ते क्लिअर करण्यासाठी पैसे भरण्याची गरज असल्याचे सांगत महिलेकडून पैसे उकळले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 11, 2021 | 10:36 AM

पुणे- नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना बँकखाते वापरास देणाऱ्या व्यवसायिकाला पुणे सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. निमेश राजेश राजन (वय २७, पश्चिम दिल्ली) असे या व्यवसायिकाचे नाव आहे. राजन हा नायजेरियन नागरिकांना कमिशनवरती आपले बँक खाते वापरण्यास देत होता. त्यासाठी नायजेरियन नागरिकांकडून एक ते दीड टक्का कमिशन घेत होता. आरोपीने राजन यांना जास्तीच्या कमिशनची लालच दाखवल्याने त्यांनी नायजेरियन आरोपींना आपले बँक खाते वापरास दिल्याचे उघड झाले आहे.

अशी केली कारवाई

पुण्यात एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या महिलेची नायजेरियन आरोपीने तब्बल ३ कोटी ९८ लाखांची फसवणूक केली होती. त्याची तक्रार पुणे पोलिसांत दाखल झाली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांना राजन यांच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. फसवणुकीनंतर पहिल्यांदा पैसे राजन यांच्या खात्यावर जमा झाले. त्यानंतर राजन यांना कमिशन देऊन ते पैसे पुन्हा दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले. आरोपी राजनचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

असे फसवले महिलेला

पुण्यात स्थायिक असलेल्या महिलेसोबत फेसबुकच्या माध्यमातून आरोपीनी महिलेशी ओळख निर्माण केली. पुढे त्या महिलेला इंटरनॅशनल फोनद्वारे संपर्क करुन महागडी भेटवस्तू पाठविल्याची बतावणी केली. मात्र परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोन्याचे दागिने व परदेशी चलन विमानतळावर कस्टमने अडवले असून ते क्लिअर करण्यासाठी पैसे भरण्याची गरज असल्याचे सांगत महिलेकडून पैसे उकळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांच्या फसवणुकीसाठी नायजेरियन नागरिकांना बँक खाते पुरविणाऱ्यांपैकी राजन एक आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३ नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. पुणे पोलिसातील पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके. सहायक आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, कुमार घाडगे, सहायक निरीक्षक शिरीष भालेराव, सचिन गवते, व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री कारण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक होत आहे. पैश्यांसाठी अनेकदा बक्षिसाचे, नोकरीचे, लॉटरी, कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवले जाते. याला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

Section 144 Imposed in Mumbai : ओमिक्रॉनचा धसका, मोर्चे, आंदोलन, रॅलीला मनाई; मुंबईत कलम 144 लागू

Homemade Face Packs : त्वचेची चमक परत हवी आहे? मग ‘हे’ फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें